पुण्यात तुळशीबागेतील श्रीराम मंदिरात चोरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – तुळशीबागेत असलेल्या श्रीराम मंदिरातील मुर्तीच्या पायातील चांदीचे ३०० ग्रॅम वजनाचे चाळ अज्ञाताने चोरल्याची घटना उघडकिस आली आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात मंदिराचे विश्वस्तांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुळशीबागेमध्ये श्रीराम मंदिर आहे. त्या मंदिरात अनोळखी व्यक्तीने येऊन मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करत श्रीरामाच्या मुर्तीच्या पायातील ३०० ग्रॅम वजनाचे चांदीचे चाळ चोरले. दरम्यान हा प्रकार १ एप्रिल रोजी घडला. परंतु तो शुक्रवारी उघडकिस आला. त्यानंतर मंदिराच्या विश्वस्तांनी यासंदर्भात विश्रामबाग पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी य़ेऊन पाहणी केली आहे. तसेच सीसीटिव्ही फुटेजही तपासले आहे. मंदिरातून चोरीस गेलेल्या दागिन्याची किंमत ११ हजार ४०० रुपये आहे. पुढील तपास विश्रामबाग पोलीस करत आहेत.

Sharad Pawar’s second grandson may contest Maharashtra Assembly elections
Pune : Youth drowns in Chakan

Loading...
You might also like