अभिनेता ते नेता बनले ‘हे’ १२ खासदार

नई दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. सगळीकडे राजकीय वातावरण गरम झाले आहे. प्रत्येक पक्ष आपल्या उमेदवारांची घोषणा करत आहे. राजकीय पक्ष आपल्या फायद्यासाठी अभिनेता-अभिनेत्रींना निवडणूकीच्या रिंगणात उतरवत आहेत. २६ मार्चला जया प्रदा यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यांना लगेच रामपुरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली. या ठिकाणी सपा विरुद्ध भाजप अशी लढत रंगणार आहे.

बुधवारी अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तिला उत्तर मुंबईतून उमेदवारी मिळण्याची शक्याता वर्तवण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी सलमान खान राजकारणात येणार असल्याची अफवा पसरली होती. मात्र, सलमान खानने ट्वीटरद्वारे आपण राजकारणात येणार नसल्याचे सांगत या अफवांना पूर्णविराम दिला. यानंतर सपना चौधरी काँग्रेसमध्ये सहभागी होणार असल्याची बातमी आली. परंतु, सपाना चौधऱीने या बातमीचे खंडन केले. सध्या ती भाजपामध्ये जाणार असल्याची चर्चा आहे.
अभिनेता-अभिनेत्री यांचे फॅन फॉलोअर्सची संख्या जास्त असते. याचा फायदा राजकीय पक्षाला होतो. एका सर्वेक्षणानुसार हिंदी आणि इतर चित्रपटातील १२ अभिनेता-अभिनेत्री १६ व्या लोकसभा निवडणुकीत निवडून आले आहेत.

२०१४ च्या लोकसभा निवडणूकीत २० ते २१ नट-नट्यांनी निवडणूक लढवली होती. मात्र, यामध्ये फक्त १० जणच खासदार झाले होते. यामध्ये सर्वाधीक भारतीय जनता पार्टीचे ६ जण निवडून आले होते तर एक उमेदवार आम आदमी पार्टीच्या तिकीटावर निवडून आला होता. आत्तापर्यंत अभिनेता ते नेता असा प्रवास करणारे १२ खासदार बनले आहेत. यामध्ये ८ जण पहिल्यांदाच खासदार बनले होते. स्वर्गीय विनोद खन्ना चारवेळा खासदार बनले होते. याशिवाय भाजपचे शत्रुघ्न सिन्हा दोनदा खासदार बनले आहेत.

आत्तापर्य़ंत अभिनेता ते खासदार बनलेले स्टार

चिराग पासवान, किरन खेर, हेमा मालिनी, गोवींदा, परेश रावल, मुनमुन सेन, विनोद खन्ना, शत्रुघ्न सिन्हा, आधिकारी दीपक, बाबुल सुप्रीयो, भगवंत मान, जयाप्रदा