…त्यांच हिंदुत्व हे हिंसक : उर्मिला मातोंडकर

मुंबई : वृत्तसंस्था – मोदी हे देश तोडण्याचं काम करत आहेत. त्यांचं हिदुत्व हे हिंसक असून  ते त्यावर आधारित असल्याची जळजळीत टिका उत्तर मुबईच्या कॉंग्रेस उमेदवार  आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी केली. बोरीवलीमध्ये काँग्रेस गुजराती सेलतर्फे आयोजित सभेमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

‘तुम्ही त्या हिंदुत्वासोबत उभे राहा जे गांधीजींनी या देशाला दिलं. त्या हिंदुत्वासोबत नाही जे फक्त पाच वर्ष जूनं आहे’, असा भाजपवर घाणाघातही उर्मिला मातोंडकर यांनी केला.

उर्मिला मातोंकर म्हणाल्या, ‘गुजरातने या देशाला महात्मा गांधी आणि सरदार वल्लभ भाई पटेल दिले. गुजरातने या देशाला ते हिंदुत्व दिलं जे महात्मा गांधींचं हिंदुत्व आहे. जे खरोखरच हिंदुत्व होतं. ते हिंदुत्व हिंसा किंवा द्वेषावर आधारित नव्हतं. जे एकमेकांचे गळे कापून त्याचा व्हिडीओ काढून लोकांपर्यंत पोहचवत नव्हतं. मात्र, आज या हिंसाचाराच्या राजकारणात लोकांना नशेच्या आहारी सोडून देश विनाशाकडे नेणारं हे हिंदुत्व आहे. जेथे देशाला धर्म, जातीच्या नावाखाली वेगळ केलं जात आहे.

पुढे मातोंडकर म्हणाल्या, ‘आज या सरकारच्या पाच वर्षाच्या कालावधीनंतरही देशात विकास तर झाला नाही. पण, देश आज त्या स्थितीत येऊन पोहोचला आहे, जिथे त्याचे अनेक तुकडे व्हायला वेळ नक्कीच लागणार नाही. त्यामुळे आज आपल्याला काँग्रेसला सत्तेत आणायचं आहे, जेणेकरुन ते देशाला एकत्र ठेवतील आणि सर्वांना सोबत घेऊन पुढे जातील.’

उर्मिला यांच्या हिंदुत्वाच्या वक्तव्यावर उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी पलटवार करत टीका केली आहे. शेट्टी म्हणाले की, हिंदुत्वावर बोलताना शरद पवारांनी एकदा ‘हिंदू आतंकवाद’ असा शब्द वापरला होता. त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले. त्यामुळे उर्मिला यांनाही त्याची किमत मोजावी लागेल. हे त्यांचे मत नसून कॉंग्रेसने लिहून दिलेलं त्या बोलण्याचा प्रयत्न करत असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.