माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जीं अद्यापही दीर्घ कोमात !

पोलीसनामा ऑनलाईन टीम – मागील काही दिवसांपासून माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसून येत नाही. त्यांच्यावर दिल्ली कॅन्टोन्मेंटच्या आर्मी रिसर्च अँड रेफरल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. अद्यापही ते दीर्घ कोमात असून व्हेटिंलेटरवर असल्याचे सांगण्यात आले आहे.

घसरुन पडल्याने मुखर्जी यांच्या डोक्याला मार लागला होता. त्यामुळे त्यांच्या मेंदूमध्ये रक्ताची गाठ झाली होती. ही गाठ काढण्यासाठी त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. तेव्हापासून त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. दरम्यान, दोन दिवसांपुवीृ माजी राष्ट्रपती मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी ट्विट करुन वडिलांच्या प्रकृतीची माहिती दिली होती. त्यांच्या प्रकृतीच्या सुधारणेसाठी सर्वांच्या सदिच्छा आणि प्रार्थनेसाठी त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली होती. भारतरत्न लता मंगेशकर यांनी देखील आपल्याला फोन करुन वडिलांच्या प्रकृतीची विचारपूस केल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.