२६-२२ असणार काँग्रेस आघाडीचा फॉर्म्युला ; पत्रकार परिषदेत झाली घोषणा

प्रत्येकी २ जागा काँग्रेस आघाडीतील मित्र पक्षांना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणूकीसाठी काँग्रेस आघाडीचे अंतिम जागावाटप झाले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी अनुक्रमे २६ आणि २२ जागांवर लढणार आहेत. तर दोन्ही पक्षांकडे असणाऱ्या प्रत्येकी २-२ जागा काँग्रेस आघाडीतील मित्र पक्षांना सोडण्यात येणार आहेत. त्यामध्ये राजू शेट्टींच्या स्वाभिमानीला, बहुजन विकास आघाडीला १ आणि अमरावतीची जागा नवनीत कौर राणा यांना सोडण्यात येणार आहे.

जागावाटपाचा निर्णय झाल्यानंतर मुंबईत महाआघाडीच्या वतीने संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसहीत इतर घटक पक्षांचे नेते देखील या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, राजू शेट्टी हे नेते पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

दरम्यान, पत्रकार परिषदेकडे राधा कृष्ण विखे पाटील यांनी पाठ फिरवल्यामुळे ही पत्रकार परिषद वेगळ्याच राजकीय चर्चेचा विषय बनली. सुजय विखे पाटील यांना काँग्रेसने नगरची जागा सोडली नसल्याने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसवर नाराज आहेत. त्यामुळेच त्यांनी पत्रकार परिषदेकडे पाठ फिरवली असल्याचे बोलले जाते आहे. राधाकृष्ण विखे पाटील आता काँग्रेस आघाडीचा प्रचार करणार की तटस्थ राहून निवडणुकीकडे बघणार हे पाहण्यासारखे राहणार आहे.

राज्यातील महाआघाडीचं असं असेल चित्र : 
काँग्रेस – 24
राष्ट्रवादी – 20
स्वाभिमानी शेतकरी (राजु शेट्टी) – 2
बहुजन विकास आघाडी – 1
युवा स्वाभिमानी – 1