राज्यात पुन्हा निवडणुका होणार ? भाजप मंत्र्याने कार्यकर्त्यांना दिले ‘हे’ आदेश

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात विधानसभेचा निकाल लागून बरेच दिवस उलटून गेलेत मात्र सत्ता स्थापनेच कोड अजून सुटलेले नाही. शिवसेना सम समान पदांची वाटणी करण्यावरून अडून बसली आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेचा तिढा वाढतच चालला आहे.

भाजपचे मंत्री जयकुमार रावल यांनी कार्यकर्त्यांच्या एका बैठकीत सध्या बहुमत नसल्याने आणि शिवसेनेच्या आडमुठेपणामुळे सत्ता स्थापनेला उशीर होत असल्याचे सांगत पुन्हा निवडणुकीला तयार रहा असे कार्यकर्त्यांना आदेश दिले आहेत. आपण अनेक जागा थोड्या फरकाने हरलो आहोत त्यामुळे पुन्हा निवडून झाल्यास आपल्याला बहुमत मिळेल असे रावल यांनी सांगितले.

जर राज्यात पुन्हा निवडणुका झाल्या तर आमची तयारी आहे असे रावल यांनी यावेळी सांगितले तसेच पुन्हा निवडणुका झाल्यास देवेंद्र फडणवीस हेच स्पष्ट बहुमताने मुख्यमंत्री होतील असा विश्वास देखील रावल यांनी यावेळी व्यक्त केला.

राज्यात सात दिवसांत सरकार स्थापन न झाल्यास राष्ट्रपती राजवट लागू होईल, असं म्हणत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सरकार बनत नाही म्हणून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची धमकी द्यायची ही तर मोगलाई आहे, अशा शब्दांत शिवसेनेनं भाजपाला लक्ष्य केलं.

संजय राऊत हे आज राज्यपालांची भेट घेणार आहेत. शिवसेना अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री हवा यावरून अडून बसली आहे तर भाजप स्पष्ट बहुमतापासून दूर असल्यामुळे सत्ता स्थापन करण्यापासून वंचित आहे. त्यामुळे सेना भाजपमधील सत्तेचा हा तिढा कधी सुटणार याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागून आहे.

Visit : Policenama.com