‘ही’ आहेत जगातील 5 धोकादायक झाडे, घेऊ शकतात आपला जीव, जाणून घ्या

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – झाडे आपल्यासाठी खूप महत्वाची आहेत. आपल्याला झाडे आणि वनस्पतींकडून स्वच्छ हवा आणि बर्‍याच गोष्टी मिळतात. बर्‍याच वनस्पतींमध्ये औषधी गुणधर्म असतात आणि ते लोकांना बर्‍याच आजारांपासून दूर ठेवतात. पण काही झाडे आपल्यासाठी धोकादायक असतात. काही झाडे विषारी असतात ज्यामुळे माणसाचा जीवही जाऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया अशा 5 वनस्पतींबद्दल….

सुइसाइड ट्री (Cerbera Odollam)
केरळ आणि आसपासच्या समुद्रकिनारी आढळणाऱ्या या वनस्पतीमुळे केरळमध्ये बरेच मृत्यू झाले आहेत. त्याच्या बियांमध्ये अल्कॉईड्स आढळतात, जे हृदय आणि श्वसन प्रणालीसाठी अत्यंत घातक ठरतात.

कनेर (Oleander-Nerium Oleander)
कनेरचे संपुर्ण झाड घातक असते. याच्या सेवनाने एखाद्या व्यक्तीला उलट्या, चक्कर येणे, लूज मोशनसह व्यक्ती कोमामध्ये जाऊ शकतो. जर याच्या पानाचा शरीराला स्पर्श झाला तर शरीराला खाज सुटण्यास सुरवात होते. कनेर इतका विषारी आहे की, त्याच्या फुलावर बसलेल्या मधमाश्यांपासून बनलेले मध खाणे एखाद्या व्यक्तीला आजारी पाडू शकते.

रोजरी पी (Rosary Pea-Abrus Precatorius)
याला रोझरी पी असे नाव देण्यात आले आहे कारण या बियाचा वापर ज्वेलरी आणि प्रार्थनेसाठी वापरल्या जाणाऱ्या माळावर देखील होतो. या बियाला स्पर्श केल्याने ते धोकादायक नसतात, मात्र ते तुटल्याने किंवा दाताने चावल्याने ते घातक ठरू शकते. त्यामध्ये अब्रिन आहे जो फक्त 3 मायक्रोग्राम मानवाचा जीव घेण्यासाठी पुरेसा आहे.

एरंडेल (Castor Bean-Ricinus Communis)
एरंडेल तेल एरंडेल बियाण्यामधून काढले जाते. त्याची बियाणे अत्यंत विषारी असतात. त्याची बियाणे इतकी विषारी आहेत की एक किंवा दोन बिया खाल्ल्यानंतर एखाद्या मुलाचा मृत्यू होतो. त्यात राइसिन नावाचे एक विष आहे जे पेशींच्या आत प्रोटीनचे संश्लेषण थांबवते आणि यामुळे उलट्या, लूज मोशन होवून माणसाचा मृत्यू होतो.

व्हाइट स्नेकरूट (White Snakeroot-Ageratina Altissima)
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांची आई नॅन्सी हॅन्क्स यांचा या वनस्पतीमुळे मृत्यू झाला होता. ही एक पांढरी फुले असलेली वनस्पती आहे. यात ट्रेमैटॉल नावाचा एक विषारी अल्कोहोल आढळतो. अब्राहम लिंकनची आई थेट वनस्पतीपासून मरण पावली नाही. त्यांनी गायीचे दूध प्यायले, जिने ही वनस्पती खाल्ली होती. खरं तर, एखाद्या प्राण्याने ते खाल्ल्यास, त्याचे मांस आणि दूध माणसाच्या शरीरात विष पसरवते.