‘या’ 6 आजारात काय खाऊ नये आणि काय खावे, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोणत्याही आजार झाल्यावर पथ्य पाळणे हे खूप महत्वाचे असते. पथ्य पाळले नाही तर अनेकदा औषध घेऊनही त्याचा परिणाम दिसून येत नाही. तसेच आजार अधिक बळावतो. यासाठी पथ्य पाळणे हे खूप महत्वाचे असते. म्हणून आजारपणामध्ये सर्वात जास्त लक्ष आपण घेत असलेल्या आहाराकडे देण्याची आवश्यकता असते. कोणत्या आजारपणात काय खाऊ नये आणि काय खावे याविषयीची माहिती आपण घेवूयात.

1) पोट खराब –
पोट खराब झाल्यास मसालेदार म्हणजे तिखट पदार्थ खाणे टाळावे. काही परिस्थितींमध्ये तिखट खाल्ले जाऊ शकते, परंतु पोट खराब झाल्याच्या स्थितीमध्ये यापासून दूर राहावे. पोट खराब झाल्यानंतर तिखट खाणे धोकादायक ठरू शकते.

Image result for थॠरोट इनॠफेकॠशन

2) थ्रोट इन्फेक्शन –
गळ्यात इन्फेक्शन झाले असेल तर कोणतेही कठीण पदार्थ खाऊ नयेत. थ्रोट इन्फेक्शन झाल्यानंतर नरम, क्रिमी पदार्थ खावेत. त्यामुळे जास्त त्रास होणार नाही. परंतु गरम पेय, चिप्स, शेंगदाणे, कच्च्या भाज्या, फळे खावू नयेत.

3) वेदना –
ज्या पदार्थांमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असते, वेदनेमध्ये त्यांचे सेवन करणे चांगले आहे. मसल्समध्ये वेदना असतील तर कॉफी आणि अल्कोहलपासून दूर राहावे.

Related image

4) उलटी –
उलटी, मळमळ होत असल्यास काहीही खाण्याची इच्छा होत नाही. परंतु, उलटी होत असल्यास पोट रिकामे ठेवणे योग्य नाही. उलटीमध्ये तेलकट पदार्थ, कॉफी, अल्कोहल, थंडपेय घेऊ नयेत.

Image result for डोकेदॠखी

5) डोकेदुखी –
डोकेदुखी होण्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे शरीरात पाण्याची कमतरता. यामुळे सतत थोडे थोडे पाणी पिणे डोकेदुखीमध्ये लाभदायक ठरते. डोकेदुखीत कृत्रिम मिठाई, मीट, चॉकलेट, सुकामेवा खावू नये.

Image result for सरॠदी

6) सर्दी –
सर्दी झाल्यास स्पायसी आहारापासून दूरच राहावे. तसेच मद्यप्राशन करू नये. अद्रकाचा चहा घेतल्यास घ्यावा.

Visit : policenama.com

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like