दैनंदिन जीवनातील ‘या’ सवयी बदलल्या तर नाही घटणार तुमचा ‘स्पर्म’ काऊंट ! जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम : धावपळ आणि तणावाच्या डेली लाईफमुळं पुरुषांमध्ये शुक्राणूंची गुणवत्ता घटताना दिसत आहे. जर स्पर्म काऊंट कमी झाला तर त्याचा फर्टीलिटीवरही वाईट परिणाम होतो. पुरुषांच्या फर्टीलिटीसंबदर्भात 90 टक्के समस्या या त्यांच्या शुक्राणूंच्या कमतरतेमुळं येतात. स्पर्म काऊंट कमी होण्याला दैनंदिन जीवनातील लहान सहान गोष्टी देखील कारणीभूत ठरतात. या सवयी जर आपण बदलल्या तर स्पर्म काऊंटची समस्या उद्भवणार नाही. याचबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.

1) शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी योगाची मदत घेऊ शकता. रोज भस्त्रिका प्राणायम, हलासन, सूर्यनमस्कार, सेतूबंघासन व धनुरासन करावं. यामुळं प्रजनन क्षमता आणि शुक्राणूंची संख्या वाढण्यासाठी फायदा होतो.

2) तणावापासून दूर रहा – तुम्ही कायमच तणावात असाल तर शुक्राणूंच्या संख्येवर आणि गुणवत्तेवर प्रतिकूल परिणाम पडतो.

3) मद्यापान आणि धूम्रपान करू नका.

4) जास्त टाईट अंडयवियर घालणं टाळावं. रात्री झोपताना जीन्स घालू नये. सैल कपडे घालूनच झोपावं.

5) लॅपटॉपला मांडीवर ठेवून काम करू नका.

6) मोबाईल कायमच पँटीच्या खिशात ठेवू नका.

7) ल्युब्रिकंटचा जास्त वापर करू नये यामुळं शुक्राणू मरू शकतात.

8) सोया मिल्कचं सेवन करणं टाळावं. यामुळं शुक्राणूंचं नुकसान होतं.

9) जे पुरुष रोज 3 किंवा त्यापेक्षा जास्त कप कॉफी पितात त्यांच्या शुक्राणूंच्या संख्येवर आणि गुणवत्तेवर वाईट परिणाम होतो. जास्त चहा किंवा जास्त कॉफीचं सेवन टाळावं.

10) स्टीम बाथ घेत असाल तर आठवड्यातून एकदाच घ्या. 40 डिग्रीपेक्षा जास्त गरम पाण्यानं जर अंघोळ केली तर शुक्राणूंची संख्या घटू शकते.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.