जड झुमक्यांमुळं होतेय कानदुखी तर तुम्हाला कामाला येतील ‘या’ ट्रीक्स, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – पोशाख साधा असला तरी डिझाइनर दागिन्यांशिवाय अपूर्ण दिसतो. विशेषत: लग्न किंवा कार्यक्रमामध्ये पारंपरिक पोशाखासह जड दागिने परिधान करणे सुंदर दिसते. परंतु जास्त काळ कानातले दागिने घालण्यामुळे स्त्रियांच्या कानात वेदना होतात. जर छोट्या गोष्टींची काळजी घेतली तर कानाच्या वेदना टाळू शकता.

झुमकेसह सहारा घाला
जड झुमकेसह कानातले सहारा देखील घालू शकता. ज्यामुळे कानाला वजन होणार नाही आणि वेदनेपासून सुटका होईल. ते साध्या पासून अनेक डिझाइनमध्ये उपलब्ध आहेत.

इअरलोब पॅच
झुमक्यामुळे होणाऱ्या दुखण्यापासून वाचण्यासाठी इअरलोब पॅच वापरू शकता. हे हलके, चिकट पारदर्शक पॅच आहेत आणि सहजपणे कानामागे चिकटतात. ते कानाचे छिद्र घट्ट धरून ठेवतात. त्यामुळे झुमक्याच्या वजनामुळे कान खाली पडू देत नाहीत आणि वेदनाही टाळू शकता.

जड झुमके टाळा
कुटुंबात लग्न असेल तर सलग अनेक दिवस कार्यक्रम चालतात. महिलांना प्रत्येक कार्यक्रमात खास दिसण्याची इच्छा असते. त्यामुळे दोन कार्यक्रमापैकी एकामध्ये जड झुमके कानात घाला. दुसऱ्या कार्यक्रममध्ये हलके झुमके घाला. त्यामुळे कानाला विश्रांती मिळेल आणि वेदना देखील टाळता येईल.

झुमके बदलत रहा
कार्यक्रमात जड झुमके घालणे आवश्यक नाही. कमी वजनाचे झुमकेही घालू शकता. त्यामुळे कानात वेदना जाणवणार नाहीत. लग्नात, पार्टीसाठी दिसायला भारी परंतु वजनाला हलके, असे झुमके निवडा.

क्रीम किंवा तेल लावा
दागिने घालण्यापूर्वी कानाला तेल किंवा क्रीम लावा. त्याने कानांची त्वचा मऊ होईल. कानांत जळजळ आणि वेदनाही जाणवणार नाहीत. त्यामुळे तुम्ही कानात जड दागिनेही सहजपणे घालू शकाल.