जाहीरनाम्याऐवजी त्यांनी माफीनामा आणायला हवा होता : कॉंग्रेसचा हल्लाबोल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजप आणि कॉंग्रेसच्या जाहिरनाम्यातील फरक त्याच्या मुखपृष्ठावरूनच दिसून येतो. कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यावर जनता दिसते आहे. तर भाजपच्या जाहीरनाम्यावर फक्त एक व्यक्ती दिसते. भाजपला जनतेशी काही देणंघेणं नाही. हे खोटं विरुद्ध न्याय असा जाहीरनामा आहे. पाच वर्षात काहीच झालेलं नाही. भाजपने जाहिरनाम्याऐवजी माफीनाम छापायला हवा होता. अशी टिका कॉंग्रेस नेते अहमद पटेल यांनी भाजपच्या जाहीरनाम्यावर केली आहे.

यावेळी कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला व इतर नेते उपस्थित होते.

कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यावर जनता आहे. तर एकीकडे भाजपच्या जाहीरनाम्यावर केवळ मीच मी असं दिसतं आहे. यांना देशाचं काही देणं घेणं नाही ना पक्ष किंवा नेत्यांशीही काही देणं घेणं नाही. भाजपने मागील पाच वर्षात काहीही केलेलं नाही. त्यामुळे त्यांनी जाहिरनाम्याऐवजी माफीनामा जाहीर करायला होता. जाहीरनाम्याऐवजी भाजपचं काम चायवाला, चौकीदार, अशा शब्दांवर चालतं. जाहीरनाम्यातील कोणत्याही गोष्टींची ते पुर्तता करत नाहीत. पाच वर्षानंतर भाजपने पाच वर्षांचा होशोब देणं गरजेचं होतं. बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या समस्या, व्यापाऱ्यांच्या समस्या यांच्यावर काहीच केलं गेलं नाही. असे ते म्हणाले.