home page top 1

‘गस्त’ घालणाऱ्या ‘त्या’ जिगरबाज पोलीस उपनिरीक्षकामुळे चोरटा ‘गजाआड’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पोलीस गस्त घालत होते. त्यावेळी अचानक ओरडणाऱ्या व्यक्तीचा आवाज कानावर पडतो. त्यानंतर त्याच्याकडे विचारणा केल्यावर दोघांनी मारहाण करून लुबाडले आणि ते पळत आहेत. असं व्यक्ती सांगते. त्यावेळी तेथे असलेले पोलीस उपनिरीक्षक त्याला दुचाकीवर बसवतात आणि पाठलाग करतात. दोघांपैकी एकाला पकडण्यात यश येते. हा प्रकार काल सायंकाळी विधान भवनाजवळील रस्त्यावर घडला.

पोलीस उपनिरीक्षक दिनेश पाटील असे पाठलाग करून पकडणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. तर त्यांनी रामललित दिनेश पासवान (मुळ. बिहार) य़ाला अटक केली आहे. तर त्याचा साथीदार पळून गेला आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्याविरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या युनीट १ चे पोलीस उपनिरीक्षक दिनेश पाटील गुरुवारी सायंकाळी विधान भवन परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी एकजण मदतीसाठी आरडाओरडा करत होता. त्यावेळी पाटील यांनी लागलीच त्या व्यक्तीकडे धाव घेतली. त्याच्याकडे विचारणा केल्यावर त्याला दोघांनी मारहाण करून लुबाडल्याचे सांगितले. त्यांनी तातडीने त्याला गाडीवर बसवून दोघे ज्या दिशेला गेले तिकडे आपली गाडी नेली. त्यानंतर त्यांनी पाठलाग करून रामललित पासवान याला पकडले. त्याच्याकडून एक ७ हजार रुपये किंमतीचा लीफोन, २ हजार रुपये किंमतीचा एक सॅमसंग फोन, १ हजार रुपयांची बॅग आणि कपडे जप्त करण्यात आले आहेत.

Loading...
You might also like