मावळ लोकसभा मतदारसंघातून पवारांची तिसरी पिढी राजकारणात ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने देखील जय्यत तयारी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीकरिता प्रत्येक पक्षाकडून कोणता उमेदवार रिंगणात असणार याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा सुरु असताना आता राष्ट्रवादी कडून अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार उतरण्याची शक्यता आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवार यांचं नाव उमेदवारीसाठी पुढे असल्याची सूत्रांची माहिती आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6f905097-c61d-11e8-bc9c-8d3339952882′]

मावळ लोकसभा मतदारसंघ सध्या शिवसेनेच्या ताब्यात आहे. श्रीरंग बारणे हे मावळचे खासदार आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघात पिंपरी, चिंचवड, मावळ, कर्जत, उरण, पनवेल विधानसभा मतदार संघ आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. बारणेंना 5 लाख 12 हजार 223 मतं मिळाली होती. तर दुसऱ्या स्थानावर शेतकरी कामगार पक्षाच्या लक्ष्मण जगताप यांना 3 लाख 54 हजार 829 मतं मिळाली होती.राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल नार्वेकर तिसऱ्या स्थानावर होते. नार्वेकरांना 1 लाख 82 हजार 293 मतं मिळाली होती.

[amazon_link asins=’B01D2IBFXM,B075K83QJK’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c9e047d8-c61d-11e8-a4c8-eb8e2091a90d’]

मागील जिल्हापरिषद निवडणुकीपासून अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार राजकारणात सक्रीय झाले आहेत. रोहित पवार यांच्या जोडीला पार्थ पवार यांना राजकारणात आणून राष्ट्रवादी राज्यातील तरुणांचे मोठी संघटना निर्माण करण्याची करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पार्थ पवार यांनी यापूर्वीही आजोबांसोबत (शरद पवार) विविध कार्यक्रमांना हजेरी लावली आहे. शिवाय त्यांनी नागपुरात विधीमंडळाचं कामकाज पाहण्यासाठीही हजेरी लावली होती.

जाहिरात