सोन्याच्या दागिन्यांवर भरपूर ‘ऑफर’, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सणाच्या हंगामात दागिन्यांची मागणी अधिक वाढते. भारत हा जगातील दुसर्‍या क्रमांकाचा सोन्याचा ग्राहक (गोल्ड कंज्यूमर) आहे. मात्र ट्रेड वॉरच्या शक्यतेमुळे सोन्याच्या किंमतींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. सप्टेंबरमध्ये सोन्याची किंमत विक्रमी उच्चांकावर पोहोचली होती. सोन्याच्या वाढत्या किंमतीमुळे ग्राहक गेल्या काही दिवसांपासून खरेदीपासून दूर आहेत. दिवाळीत सोन्याची किंमत कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काही ज्वेलर्स दागिन्यांच्या खरेदीसाठी ऑफर्स देत आहेत. जाणून घ्या ऑफेरविषयी –

तनिष्क –
टायटनशी करार केलेली तनिष्क ही भारतातील सर्वात महागडी ज्वेलर्स कंपनी आहे. कंपनीने सोन्याचे आणि डायमंडच्या दागिन्यांच्या घडवणुकीचे शुल्क 20 टक्क्यांनी कमी केले आहे. यासह ही कंपनी सोशल मीडिया स्पर्धेच्या माध्यमातूनही विजेत्याची निवड करेल आणि विजेत्याला दागिने व सोन्याचे नाणी देईल.

कल्याण ज्वेलर्स –
कल्याण ज्वेलर्स ही कंपनी वारबर्ग-पिनस एलआयसीची पाठबळ असलेली असून या हंगामात कमी घडवणूक खर्चासह तीन लाख सोन्याच्या नाण्यांचे वितरण करणार आहे. कंपनीचे अध्यक्ष टी.एस. कल्याणरमण म्हणाले की, साप्ताहिक सोडतीच्या माध्यमातून लोकांची निवड करुन त्यांना सोन्याची नाणी दिली जातील. नुकतीच सोन्याच्या किंमतीत घसरण झाल्याने लहान दागिन्यांची विक्री वाढली आहे. यासह कल्याण ज्वेलर्सने बँकांना अतिरिक्त सवलत देण्यासाठी भागीदारी केली आहे.

मालाबार गोल्ड अँड डायमंड्स –
मालाबार कंपनी 15 हजार रुपयांहून अधिक खरेदी करणार्‍या ग्राहकांना सोन्याची नाणी देणार आहे. तसेच, कंपनी आगाऊ ऑर्डर घेत आहे. म्हणजेच, तुमची इच्छा असल्यास तुम्ही कमी दर असताना सोन्याचे दागिने बुक करुन काही काळाने उर्वरित रक्कम भरू शकता.

Visit : Policenama.com