‘या’ महिलेकडे नाही प्रायवेट पार्ट, सेक्ससाठी मागते लोकांकडे मदत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एरिजोना येथे राहणारी 22 वर्षीय महिला लोकांकडे आपल्या सर्जरीसाठी मदत मागत आहे. त्यासाठी ती लोकांकडून फंड गोळा करत आहे. महिलेला आपल्या प्रियकरासोबत संबंध बनवायचे आहेत परंतु तिच्याकडे तिचा प्रायवेट पार्ट नाही म्हणून ती सध्या सर्जरीसाठी मदत मागत आहे.

कायली मोटस या महिलेचा जन्म प्रायवेट पार्ट शिवाय झाला होता. यामुळे संबंध ठेवण्यासाठी तिला ऑपरेशन करावे लागणार आहे. तिच्या शरीरामध्ये गर्भाशय आणि योनी नाही. कायली सध्या बिना प्रायवेट पार्ट शिवाय आणि गर्भाशया शिवाय जगत आहे. ज्यावेळी फक्त तिच्या जवळच्या लोकांना याबाबत माहिती होती तिला काही अडचण नव्हती परंतु आता तिला आपल्या प्रियकरासोबत संबंध ठेवायचे आहेत.

कायली अनेक महिन्यापासून रोबी लिमर नावाच्या मुलासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. तिला आपल्या प्रियकरासोबत शारीरिक संबंध ठेवायचे आहेत परंतु प्रायवेट पार्ट नसल्यामुळे इच्छा असूनही तिला असे करता येत नाही. अशात आता तिला ऑपरेशन करायचे आहे.

अठरा वर्षांची होऊनही कायलीला मासिक पाळीला सामोरे जावे लागत नव्हते त्या वेळी तिला या सर्व गोष्टींबाबत समजून आले. त्यानंतर तिने डॉक्टरांशी संपर्क केला तेव्हा तिला समजून आले की प्रायवेट पार्ट मधील समोरचा भागच तिच्याकडे नाही. यासाठी ऑपरेशनला लागणारा खर्च जमा व्हावा म्हणून कायली एक ऑनलाइन अभियान चालवत आहे. तिचा प्रियकर देखील यासाठी तिला मदत करत आहे. आतापर्यंत तीला 15000 डॉलर जमावण्यात यश आले आहे.