मंत्रालयात लेटर’बॉम्ब’ ! चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जीवे मारण्याची धमकी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात विधानसभा निवडणूकांचा प्रचार अंतीम टप्प्यात आला आहे. राज्यात होत असलेल्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यभर प्रचार सभा घेत आहेत. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र मंत्रालयात आले आहे. मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र आल्याने मंत्रालयात खळबळ उडाली आहे.

मंत्रालयात मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र आल्यानंतर मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात याची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांकडून हे पत्र कोणी आणि कोढून पाठवले याचा शोध सुरु केला आहे. मंत्रालयात आलेले हे पत्र शुक्रवारी (दि.18) आले असून हे पत्र निनावी आहे. या पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

अज्ञात व्यक्तीद्वारे आलेल्या या लेट बॉम्बने मंत्रालयात खळबळ उडाली आहे. हे पत्र शुक्रवारी मिळाले असून पत्र मिळाल्यानंतर मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या कार्यालयाची सरक्षा वाढवण्यात आली आहे. गृहमंत्रालयाने याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आहे. धमकीचे पत्राने राजयकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलीस धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like