चाकूचा धाक दाखवून कार चोरुन नेणारे ३ तासात गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

भाडे मिळण्याची वाट पहात उभे असलेल्या उबेर कारचालकाला चार जणांनी मारहाण करुन कार चोरुन नेली. ही घटना गुरुवारी (दि.११) पहाटे सहाच्या सुमरास बालेवाडी येथील जुना जकात नाका येते घडली होती. या गुन्ह्यातील आरोपींना चतु:श्रृंगी पोलिसांनी अवघ्या तीन तासात अटक करुन गुन्हा उघडकीस आणला आहे. आरोपींकडून चोरून नेलेली कार आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण ३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’cbd2767f-ce16-11e8-b964-677ea88c251a’]

सागर गोरखनाथ बडवे (वय-२० रा. निगडी), तनुष अजय वाघमारे (वय-१९ रा. निगडी) यांच्यासह दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. विकी रमेश लोणकर (वय-२७ रा. जयभवानी संतोष मंगल कार्य़ालयासमोर, थेरगाव) याने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकी लोणकर यांची उबेर परमिट कार असून गुरुवारी पहाटे ते बालेवाडी येथे मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची वाट पहात उभे होते. त्यावेळी दोन दुचाकीवरुन चारजण कारजवळ आले. त्यापैकी पांढऱ्या रंगाचा शर्ट घातलेल्या चोरट्याने विकीला चाकूचा धाक दाखवून कारमधून खाली उतरवले. त्याच्याकडे पैशांची मागणी करुन त्याला मारहाण केली. तसेच दोघांनी त्याच्या कारची चावी जबरदस्तीने घेऊन ३ लाख रुपये किंमतीची वॅगनर कार घेऊन गेले तर इतर दोघे जण दुचाकीवरुन निघून गेले.
[amazon_link asins=’B07CRCPM4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d3b1892a-ce16-11e8-a2d6-b11090c2fea0′]

घटनेची माहिती मिळताच चोरट्यांचा शोध घेण्यासाठी चतु:श्रृंगी पोलिसांचे एक पथक तयार करण्यात आले. आरोपी हे आझादचौक निगडी येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पथकाने या ठिकाणी सापळा रचून आरोपींना अटक करुन चोरीचा मुद्देमाल जप्त केला.
[amazon_link asins=’B0796QP4LS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d9ae965a-ce16-11e8-b32e-791d65caab93′]

ही कारवाई परिमंडळ -४ चे पोलीस उपायुक्त प्रसाद अक्कानवरु, खडकी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, पोलीस उपनिरीक्षक प्रेम वाघमारे, पोलीस कर्मचारी बाळु गायकवाड, संजय वाघ, सारस साळवी, दादा काळे, महेश बामगुडे संतोष जाधव यांच्या पथकाने केली.