पुणे : शहर, ग्रामीण मधील ‘ते’ ३ पोलीस तडकाफडकी निलंबित

पुणे :  पोलीसनामा ऑनलाईन : पुणे शहर पोलीस दलातील २ पोलीस कर्मचाऱ्यांना तर पुणे ग्रामीण पोलीस दलातील एका अशा तीन पोलीसांना निलंबित करण्यात आले आहे. पुणे पोलीस दलातील चंदननगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला बलात्काराच्या गुन्ह्यात अटक केल्याप्रकऱणी व वानवडी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याला लाच घेतल्या प्रकऱणी निलंबित करण्यात आले आहे. तर शिक्रापूर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस फौजदाराला लाच स्विकारल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे.

पुणे पोलीस दलातील सचिन राजाराम कोळी, निसार खान आणि पुणे ग्रामीण पोलीस दलातील अनिल कोळेकर या तिघांना निलंबित करण्यात आले आहे.

चंदननगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या सचिन राजाराम कोळी याच्यावर लग्नाच्या अमिषाने तरुणीवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करून मुंढवा पोलिसांनी अटक केली होती. त्यामुळे त्याने पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणारे कृत्य केल्याने शिस्तभंगाची कारवाई म्हणून पोलीस उपायुक्त प्रसाद अक्कानवरू यांनी निलंबीत करण्याचे आदेश दिले आहेत.

तर एका भंगार खरेदी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या महिलेला चोरीचा माल खरेदी केल्याचे सांगून व्यवसाय करण्यासाठी व कारवाई न करण्यासाठी वानवडी पोलीस ठाण्यात कार्यरत पोलिस हवालदार निसार खान यांनी १५ हजार रुपयांची लाच मागणी केली. त्यानंतर ५ हजार रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपतच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले होते. त्यामुळे पोलीस हवालदार निसार खान यांना पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.

शिक्रापूर पोलीस ठाण्यात कार्यरत सहायक पोलीस उपनिरीक्षक अनिल बबन कोळेकर यांना लाचलचुपतच्या पथकाने २० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले होते. त्यामुळे त्यांनी पोलीस दलाची प्रतिमा मलीन करण्याचे कृत्य अनिल कोळेकर यांना निलंबित करण्याचे आदेश पोलीस अधिक्षक संदिप पाटील यांनी दिले आहेत.