खळबळजनक ! तरुणावर धारदार शस्त्रांनी सपासप वार करून खून

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – तरुणावर धारदार शस्त्रांनी सपासप वार करून त्याचा खून करण्यात आल्याची घटना कागल येथीलप आंबेकर एक्साईज परिसरात शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.

सुरज नंदकुमार घाडगे (वय २४) असे खून करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अनोळखी तरुणांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

सुरज घाडगे हा आंबेकर एक्साईज परिसरात राहण्यास आहे. तो शनिवारी सायंकाळी घरी असताना साडेसहाच्या सुमारात तीन अनोळखी तरुण त्याच्या घरी आले. त्यांनी सुरजला काही बोलायचे आहे. म्हणून बाहेर नेले. त्यानंतर घरापासून ५० ते ६० फुट अंतरावर नेत तिघांनी त्याच्यावर चाकूने सपासप वार केले. सुरजची आई सुरेखा आणि गल्लीतील तरुणांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याचा उपचारापुर्वी मृत्यू झाला.

You might also like