जळगाव : गणेश विसर्जनासाठी गेलेल्या तिघा भावांचा बुडून मृत्यू

चोपडा : पोलीसनामा ऑनलाइन  –   गणरायाच्या विसर्जनासाठी गेलेल्या तिघा तरुणांचा गूळ नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला असल्याची घटना चोपडा तालुक्यातील विरवाडे येथे घडली. मृत्यू झालेल्यांमध्ये दोन सख्ख्या भावांसह चुलत भावाचाही समावेश आहे. सुमित भरतसिंग राजपूत (वय २०), कुणाल भरतसिंग राजपूत (वय २२) आणि ऋषिकेश रजेसिंग राजपूच (वय २२), अशी मृत्यू पावलेल्या तरुणांची नावे आहेत.

या दर्देवी घटनेमुळे विरवाडे गावात शोककळा पसरली आहे. सुमित आणि कुणाल हे दोघे भाऊ होते, तर ऋषिकेश त्यांचा चुलत भाऊ होता. एकाच घरातील तिघा सदस्यांचा मृत्यू झाल्यामुळे राजपूत कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सविस्तर वृत्त असे की, आज दुपारच्या सुमारास तिघे जण गणपती विसर्जनासाठी गूळ नदीवर गेलेले होते. नदीमध्ये निजरदेव या ठिकाणी पाण्याचा डोह आहे. पावसामुळे गूळ प्रकल्पातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. त्यामुळे डोहात खूप पाणी होते. गणेश विसर्जनासाठी डोहात उतल्यानंतर डोहाच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे तिघेजण पाण्यात बुडले, याबद्दल अधिक माहिती मिळालेली नाही.

पाण्यात बुडल्यानंतर सोबत आलेल्या मित्रांच्या लक्षात आले. विरवाडे ग्रामस्थांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. उशिरापर्यंत पाण्यातून मृतदेह काढण्याचे काम सुरू होते. चौपडा पोलीस ठाण्यामध्ये घटनेची प्राथमिक नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक पोलिस अधिक्षक सौरव कुमार अग्रवाल, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनेची माहिती घेतली आण गुन्हा दाखल करून घेतला.