मुलानं सांगितलं – ‘मी सकाळीच चीनहून आलोय’, रिकामी झाली ‘दिल्ली मेट्रो’, 30 लाख वेळा पाहिला गेला हा TikTok व्हिडीओ

पोलीसनामा ऑनलाईन : रोजच्या प्रमाणे आजही टिकटॉकवर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कोरोना व्हायरस हळूहळू भारतात पसरत चालला आहे. तो टाळण्यासाठी लोक मास्क लावत आहेत. दरम्यान, सोशल मीडिया अ‍ॅप टिकटॉकवर यासंबंधीत व्हिडिओ तयार केले जात आहेत, जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरून समोर आला आहे. दिल्ली मेट्रोमध्ये एक मुलाने मजेदार व्हिडिओ तयार केला आहे. त्याने दोन व्हिडिओ एकत्र करत तो व्हिडीओ तयार केला आहे. या व्हिडिओमध्ये दाखविले कि, मेट्रोमध्ये जागा मिळवण्यासाठी मुलगा फोनवर म्हणतो की, तो चीनहून आला आहे. त्यानंतर लगेचच सगळी मेट्रो रिकामी होते, असे दिसते आहे. परंतु त्याने दोन व्हिडिओ कट करून हा व्हिडिओ बनविला आहे. हा बनावट व्हिडिओ टिकटॉकवर बराच व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये पाहता येईल की, फोनवर बोलणारी व्यक्ती म्हणते, “मी सकाळी चीनहून आलो आहे …” लगेच ती व्यक्ती आजूबाजूला पाहते आणि संपूर्ण जागा रिकामी होते. परंतु हा व्हिडिओ मॉर्फ केला आहे. पहिल्यांदा व्हिडिओ पाहिल्यावर असे उघडकीस आले की मेट्रो रिकामी झाली. परंतु त्याने दोन व्हिडिओ कापून हा व्हिडिओ बनविला आहे.

https://www.tiktok.com/@kapilkashyap628/video/6794396560261123329

हा व्हिडिओ टिकटॉक क्रिएटर कपिल कश्यप यांनी सामायिक केला आहे, ज्याचे 3.8 दशलक्ष व्ह्यूज आहेत. तसेच 98 हजाराहून अधिक लाईक्स आणि सुमारे 300 कमेंट्स आल्या आहेत.

दरम्यान, भारतात कोरोना विषाणूचा बळी पडणाऱ्यांची संख्या 28 वर पोहोचली असून त्यात 16 परदेशी आणि 12 भारतीयांचा समावेश आहे. चीनमध्ये कोरोना विषाणूची सुरूवात झाल्यापासून तेथील सर्व कारखाने बंद आहेत ज्यामुळे भारतातील औषध कंपन्यांना आवश्यक कच्चा माल मिळत नाही. अशा परिस्थितीत देशभरात अत्यावश्यक औषधांचा अभाव लक्षात घेऊन सरकारने त्यांच्या निर्यातीवर बंदी घातली.