तुमचे दावे खोटे , पाकिस्तानची wait and watch ची धमकी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताने मंगळवारी केलेल्या हवाई हल्ल्याने पाकिस्तान हादरला असून भारताला चोख प्रतिउत्तर देण्याच्या तयारीत आहे. मंगळवारी पहाटे भारताकडून हल्ला झाला,  त्यानंतर पाकिस्तानी लष्कर प्रमुख मेजर जनरल असीफ गफूर जवळपास साडे पाच वाजण्याच्या सुमारास एक पत्रकार परिषद घेतली. त्यात भारताला पाकिस्तानी लष्कर प्रमुखाने चिथावणी दिली आहे. भारताने जो एअर स्ट्राईक केला आहे . त्याला पाकिस्तान प्रत्युत्तर दिले जाईल. आमच्या प्रतिक्रियेची वाट पहा…! असा इशाराच दिला आहे.

पाकच्या हवाई हद्दीत २१ मिनिट टिकूनच दाखवा , पाकची चिथावणी – भारताने केलेल्या ३५० अतिरेक्यांच्या खात्म्याला देखील त्यांनी चुकीचे ठरवले आहे. भारताने केलेले सर्व दावे खोटे असल्याचे पाकिस्तानी लष्कर प्रमुखाने म्हंटले आहे. कुटनीती, राजकारण आणि लष्कर या तिन्ही माध्यमातून भारताला उत्तर दिलं जाईल असंही गफूर यांनी म्हटलं आहे. 21 मिनिटं भारतीय वायुदलाची विमानं पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रात होती त्यांनी दहशतवाद्यांना कंठस्नान घातले हा दावा साफ खोटा आहे. हिंमत असेल तर भारतीय वायुदलाने 21 मिनिटं आमच्या हवाई क्षेत्रात त्यांची विमानं ठेवून दाखवावीत असं आव्हानही गफूर यांनी दिलं. चार मिनिटांमध्येच आमच्या वायुदलाने दिलेल्या आव्हानामुळे भारतीय वायुदलाची विमानं त्यांच्या हद्दीत निघून गेली असं मेजर जनरल गफूर यांनी म्हटलं आहे.

https://twitter.com/OfficialDGISPR/status/1100372983925878784

पाकची चिथावणी – कोणत्याही प्रसंगासाठी तुम्ही तयार रहा, अशी सूचना आम्हाला पंतप्रधान इम्रान खान यांनी दिली होती. त्यामुळे १४ फेब्रुवारीनंतर आम्ही डोळ्यात तेल घालून सज्ज होतो. भारतीय वायुदलाची विमानं जेव्हा पाकिस्तानच्या हवाई हद्दीत आली तेव्हा आमच्या वायुदलाने तातडीने त्यांना आव्हान दिलं. भारतीय वायुदलाची विमानं अवघी चार मिनिटे आमच्या हवाई हद्दीत होती असेही गफूर यांनी म्हटलं आहे. तुम्ही जी कारवाई केलीत त्यावर तुम्हाला कसं प्रत्युत्तर द्यायचं याचा निर्णय आम्ही घेतला आहे. तुमच्यासाठी ते सरप्राईज आहे त्याची वाट बघा असा इशाराच गफूर यांनी दिला आहे.

३५० दहशतवादी मारल्याचा दावा खोटा – भारत जाणीवपूर्वक ३५० दहशतवादी मारल्याचा दावा केला आहे, तो देखील खोटा आहे. ज्या ठिकाणी हल्ला केल्याचा दावा भारताने केला आहे .  तो आम्ही सगळ्यांसाठी खुला ठेवला आहे. पाकिस्तानमधली एक वीटही भारताला पाडता आलेली नाही. इतकंच नाही तर एकाही दहशतवाद्याचा मृतदेह त्या ठिकाणी नाही. ३५० सोडा १० दहशतवादी जरी असते तर तिथे मृतदेह असते. मात्र तिथे काहीही नाही. भारताचे पंतप्रधान खोटं बोलत आहेत, खोटं बोलण्यात ते तरबेज आहेत , असाही आरोप गफूर यांनी केला. तसेच तुम्ही हे समजू नका की आम्हाला सरप्राईज मिळाले आहे. आम्ही तुमच्या कोणत्याही हल्ल्यासाठी तयार होतो. आता आम्ही तुम्हाला सरप्राईज देणार आहोत. योग्य वेळेची वाट आता तुम्ही बघा असंही गफूर यांनी म्हटलं आहे.