‘या’ 4 चुकीच्या सवयींमुळे होऊ शकता लठ्ठपणाचे ‘शिकार’, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – जगभरात कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अनेक देशांनी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. लॉकडाऊन मध्ये सर्वजण घरी बसुन आहेत. तसेच अनकेजण वर्क फ्रॉम होम सुद्धा करत असल्यामुळे शरीराची फारशी हालचाल होत नाही. त्यामुळे वजन वाढण्याची समस्या निर्माण होत आहे. लहानांपासून वयोवृद्ध नागरिकांपर्यंत सर्वांनाच ही समस्या उद्भवत आहे. तुम्ही केलेल्या काही चुकांमुळे काही सुद्धा फास्ट फूड न खाता तुम्ही लठ्ठपणाचे शिकार होऊ शकता. आम्ही आज आपणास या सवयींनबाबत सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही आपल्या सवयीत बदल करुन आपले आरोग्य सुदृढ ठेवू शकता.

१. जास्त वेळ झोपणं
अनेकांना लॉकडाऊन मुळे घरात बसून खूपच आळस येत आहे. रात्री उशीरापर्यंत जागून सकाळी उशीरा उठण्याचे प्रमाण वाढलं असून, ९ तासांपेक्षा जास्त झोपेला ओव्हर स्लिप समजलं जातं. तर ७ तासांपेक्षा कमी झोपल्यामुळे आजरांचा धोका वाढतो आणि जास्त झोपल्याने वजन वाढण्याची समस्या निर्माण होते. त्यामुळे झोपेच्या वेळेत नियमित पणा ठेवला पाहिजे. वेळेत झोपायला आणि उठायला सुरुवात करा.

२. पाणी कमी पिणं
कमी पाणी पिल्यामुळे शरीराचं मोठं नुकसान होत. वाढत्या तापमानात उष्णतेचा त्रास वाढून शरीर डिहाड्रेड होण्याची शक्यता असते. पाणी कमी पिल्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होत नाही. तुम्हाला तुमचे वजन कमी करायचं असेल तर जास्तीत जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करा. तसेच दिवसात ८ ते १० ग्लास पाणी प्या. यामुळे शरीरातील टॉक्सीन्स बाहेर पडण्यास मदत होते.

३. नाष्ता न करणं
लॉकडाऊनच्या दरम्यान अनेकजण असे विचार करतात की, घरात असल्यामुळे नाष्ता कधीही सुद्धा करु शकतो. अथवा केला नाही तरी चालेल. मात्र नाष्ता न केल्यामुळे मेटाबोलिज्म प्रभावित होऊन वजन वाढण्याची शक्यता वाढते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर न चुकता नाष्टा करा. नाष्ता मध्ये फायबर्सयुक्त पदार्थाचा समावेश करा.

४. व्यायाम, स्ट्रेचिंग न करणं
लॉकडाऊन काळात अनेक जिम बंद आहेत. फक्त चालून वजन कमी होणार नाही. त्यासाठी शरीराची स्ट्रेचिंग आणि व्यायाम करणं देखील तेवढंच महत्वाचं असणार आहे. स्वतः करता १० ते २० मिनिट वेळ देत तुम्ही शरीराची स्ट्रेचिंग करुन व्यायाम करा. स्ट्रेचिंग केल्यामुळे शरीर लवचिक होत, तसेच शरीराचा आकार बेढब होऊ नये असं वाटतं असेल तर रोज जमेल तसे सोपे व्यायाम प्रकार करा व शरीर निरोगी ठेवा. लठ्ठपणा असल्यामुळे तुम्हाला वेगवेगळे आजार उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे लॉकडाऊन काळात वजन वाढणार याची काळजी घ्या.