गांगुली असेल BJP चा चेहरा ? TMC खासदार म्हणाले – ‘त्यांना माहिती नाहीत गरिबांच्या अडचणी, टिकू शकणार नाहीत’

कोलकाता : वृत्तसंस्था – पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी होणार्‍या विधानसभा निवडणुकीसाठी आतापासूनच तयारी सुरू झाली आहे. मोठ्या कालावधीपासून अशी शक्यता वर्तवली जात आहे की, भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार सौरव गांगुली राजकारणात येऊ शकतो आणि भाजपमध्ये सहभागी होऊ शकतो. या शक्यतेवर आता तृणमूल काँग्रेसकडून प्रतिक्रिया आली आहे, टीएमसी खासदार सौगत रॉय यांचे म्हणणे आहे की, जर सौरव गांगुलीने असा निर्णय घेतला, तर त्यांना खूप दु:ख होईल.

सौगत रॉय यांनी म्हटले की, सौरव गांगुली सर्व बंगालींसाठी एक आयकॉन आहे, जर ते राजकारणात आले तर मी खूश होणार नाही. ते बंगालमधून एकमेव क्रिकेट कर्णधार आहेत, टीव्ही शोमुळेसुद्धा फेमस आहेत. त्यांचे राजकारणात काहीही बॅकग्राउंड नाही, अशात ते टिकू शकणार नाहीत.

टीएमसी खासदाराने म्हटले, सौरव गांगुलीला देश आणि गरिबांच्या समस्यांबाबत माहीत नाही, गरिबी आणि मजुरांच्या अडचणींबाबत माहिती नाही. भाजपवर निशाणा साधताना सौगत रॉय यांनी म्हटले की, भाजपकडे मुख्यमंत्री पदाचा कुणीही उमेदवार नाही, या कारणामुळे अशा प्रकारच्या गोष्टी पसरवत आहेत.

सध्या भाजपकडून बंगालमध्ये कोणत्याही चेहर्‍याशिवाय निवडणुकीत उतरण्याबाबत बोलले जात आहे. परंतु मोठ्या कालावधीपासून शक्यता वर्तवली जात आहे की, भाजपकडून सौरव गांगुली मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असू शकतात. मात्र, यास दुजोरा मिळू शकलेला नाही.

मागील काही दिवसांपूर्वी जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बंगालमध्ये आले होते, तेव्हासुद्धा त्यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र, अमित शाह यांनी यावर उत्तर दिले नव्हते आणि अजूनपर्यंत अशी काही चर्चा झालेली नाही, जेव्हा काही निर्णय होईल तेव्हा महिती दिली जाईल, असे ते म्हणाले होते.