नरेंद्र मोदींना पर्याय आहे का ? शरद पवारांनी दिलं ‘हे’ उत्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशातील जनतेच्या मूडबद्दल मोठे विधान केले आहे. केंद्र सरकारने अनेक चुकीचे निर्णय घेऊनही लोक वेगळी भूमिका का घेत नाही ? त्याची तुलना का करत नाही ? असा प्रश्न उपस्थित करत लोकांना नरेंद्र मोदी यांना पर्याय हवा आहे, असे मत शरद पवारांनी व्यक्त आहे.

महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला एकत्र आणलं. त्या प्रयोगाची देशात चर्चा झाली. देशपातळीवर सर्व विरोधक एकत्र आले तर भाजपची घोडदौड रोखू शकतात अशी भावना व्यक्त केली गेली. मात्र, त्या प्रमाणे प्रयत्न होताना दिसत नाहीत. तसे वातावरण असताना राष्टवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी मोठे वक्तव्य केले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवार यांनी हे वक्तव्य केले आहे.

पवार म्हणाले, नरेंद्र मोदी हे त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. त्याचबरोबर सरकारमध्येही ते सर्वोच्च स्थानी आहेत. त्यांची विचारसरणी वेगळी आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत जाऊ शकत नाही. त्यावरून आम्ही त्यांच्यावर टीकासुद्धा करतो. पण, अनेक लोकहितासाठी मारक निर्णय घेतल्यानंतरही लोक वेगळी भूमिका घेऊन त्यांची तुलना का करत नाही ? कारण लोकांना पर्याय अपेक्षित आहे. आम्ही पर्याय देऊ शकतो, असा आत्मविश्वास जनतेमध्ये निर्माण करण्यात कुणाला यश मिळाल आहे का ? असे शरद पवार म्हणाले.

Visit : Policenama.com