राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष उद्या नगरमध्ये !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील जागावाटपात नगरची जागा राष्ट्रवादीकडेच राहणार असल्याचे स्पष्ट झाल्याने पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी तातडीने नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार उद्या दुपारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे नगरला येणार आहेत. लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय येथे होणाऱ्या पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला पक्षाध्यक्ष शरद पवार हे व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे मार्गदर्शन करणार आहेत.

डॉ. सुजय विखे यांच्या भाजपा प्रवेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा पातळीवरील हालचाली गतीमान हालचाली झाल्या आहेत. डॉ. सुजय विखेंच्या उमेदवारीला शेवटपर्यंत विरोध कायम ठेवत ही जागा राष्ट्रवादीच लढणार या भूमिकेवर पक्षाध्यक्ष शरद पवार हे ठाम राहिले परिणामी डॉक्टर सुजय विखे यांना आज दुपारी भारतीय जनता पक्षात प्रवेश करावा लागला. विकी आमचा पराभव करण्यासाठी पवार यांनी स्वतः लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे त्या पार्श्वभूमीवर बुधवारी दुपारी एक वाजता राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे उपस्थित राहणार आहेत. याच बैठकीत पवार हे कार्यकर्त्यांशी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधणार आहेत. त्यामुळे पवार हे नगरच्या कार्यकर्त्यांना नेमका काय संदेश देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पक्षाच्या जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी सदर बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ह्याहि बातम्या वाचा

काँग्रेसनं खूप काही दिलं… विखेंनी असं करायला नको होतं : बाळासाहेब थोरात

बाहुबली चित्रपटातील ‘ही’ अभिनेत्री पॉर्न स्टारच्या भूमिकेत

दुटप्पी भूमिकेमुळे संजय काकडे काँग्रेस उमेदवारीच्या स्पर्धेतून बाद ?

… त्यामुळेच पवारांची निवडणुकीतून माघार : चंद्राकांत पाटील

पार्थ पवारांच्या उमेदवारीने श्रीरंग बारणे अडचणीत