Aadhaar Card मध्ये तुमचे नाव चुकीचे आहे का ?, असे करू शकता दुरूस्त, जाणून घ्या प्रक्रिया

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) देशातील प्रत्येक भारतीयाला 12 अंकाचे ओळख संख्या असलेले आधार जारी करते. आधार कार्डचा वापर बँक, टेलीकॉम कंपन्या, वितरण प्रणाली आणि प्राप्तीकर विभागासह अनेक प्राधिकरणांद्वारे ओळखीचा पुरावा म्हणून घेतले जाते. यासाठी आधार कार्ड पूर्णपणे अपडेट असणे महत्वाचे ठरते. मात्र, अनेकदा असे होते की, आधार कार्डचा अर्ज करतेवेळी काही कारणास्तव सिस्टमध्ये चुकीचे नाव फीड होते, यामुळे अनेक प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावे लागते. तर, अनेकदा लग्नानंतर जर तुम्ही नावात बदल केला तर आधार कार्डातील नावातही बदल करावा लागतो.

मात्र, यासाठी त्रस्त होण्याची आवश्यकता नाही. तुम्ही अतिशय सहजपणे आधार कार्डमध्ये आपल्या नावात सुधारणा करू शकता. तुम्ही युआयडीएआयच्या वेबसाइटद्वारे ऑनलाइन माध्यमातून आधार कार्डमध्ये दुरूस्ती करू शकता. याशिवाय जवळच्या आधार सेवा केंद्रात सुद्धा जाऊन आधार कार्डमधील नावात कोणत्याही प्रकारचा बदल करू शकता.

आवश्यक कागदपत्रे

पासपोर्ट, पॅन कार्ड, रेशन कार्ड, पीडीएस फोटो कार्ड, वोटर आयडी, ड्राव्हिंग लायसन्स, नरेगा जॉब कार्ड, गव्हर्नमेंट फोटो आयडी कार्ड्स, शस्त्र लायसन्स, फोटो बँक एटीएम कार्ड, पेन्शनर फोटो कार्ड, किसान फोटो पासबुक, फोटो लावलेले विवाह प्रमाणपत्र, गॅझेट नोटिफिकेशन.

नावात अशी करू शकता ऑनलाइन दुरूस्ती

* सर्वप्रथम https://uidai.gov.in/ वर जा.

* येथे होमपेजवर माय आधारचे सेक्शन दिसेल.

* माय आधार सेक्शन अंतर्गत अपडेट यूवर आधारचे ऑपशन दिसेल.

* अपडेट यूवर आधारच्या अंतर्गत अपडेट डेमोग्राफिक डाटाव ऑनलाइन वर क्लिक करा.

* आता तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल.

* या पेजवर तुम्हाला नाव, जन्म तारीख, लिंग, पत्ता आणि भाषा ऑनलाइन बदलण्याचा पर्याय दिसेल.

* नव्या पेजवर प्रोसीड टू अपडेट आधार वर क्लिक करा.

* आता तुमच्या समोर नवे पेज ओपन होईल.

* या नव्या पेजवर आधार कार्ड नंबर, एनरॉलमेंट नंबर, किंवा व्हर्च्युअल आयडीपैकी कोणतीही एक संख्या टाका आणि त्यानंतर कॅप्चा कोड टाका.

* यानंतर उघडणार्‍या पेजवर आवश्यक माहिती भरून आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करून तुम्ही आधार कार्डमध्ये नावात बदलाचा अर्ज देऊ शकता.

आधार सेवा केंद्राद्वारे

* यासाठी जवळच्या आधार नोंदणी केंद्रावर जावे लागेल.

* या केंद्रावर आधार दुरूस्ती फॉर्म भरावा लागेल.

* या फॉर्ममध्ये योग्य माहिती भरा.

* योग्य नाव आणि योग्य स्पेलिंगचे डॉक्युमेंट सोबत द्या.

* या दुरूस्तीसाठी एक किरकोळ रक्कम द्यावी लागेल.

* या प्रक्रियांच पालन केल्यानंतर तुमच्या नावात दुरूस्ती होईल.