गाईला स्पर्श केल्याने नकारात्मकता दूर होते, कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकूर यांचा दावा

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – तिवाश्याच्या आमदार आणि ठाकरे मंत्रिमंडळात महिला आणि बालकल्याण मंत्री असलेल्या यशोमती ठाकूर या आपल्या अजिब विधानांमुळे चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. गाईला स्पर्श केल्याने नकारात्मकता दूर होते’ अशा प्रकारचे विधान ठाकूर यांनी एका कार्यक्रमादरम्यान केले होते.

काही दिवसांपूर्वी देखील अशा प्रकारचे एक विधान ठाकूर यांनी केले होते. जे आपल्याविरोधात आहेत, त्यांचे खिसे भरलेले आहेत. त्यांचे खिसे खाली करण्यासाठी ते येत असतात. आपले काही सरकार नव्हते आणि आता फक्त शपथच घेतलेली आहे. अजून खिसे गरम व्हायचे आहेत, असे विधान माहिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारात केले होते.

या विधानानंतर यशोमती ठाकूर यांना मोठ्या वादाला सामोरे जावे लागले होते. आता पुन्हा एकदा ठाकूर यांनी गाईवरून केलेल्या एका विधानामुळे त्या चर्चेत आल्या आहेत. गाईला स्पर्श केल्याने सर्व नकारात्मकता दूर होते आमची संस्कृती सांगते की, जर आपण गाईला स्पर्श केला तर सर्वच नकारात्मकता दूर होते. अशा प्रकारचे विधान ठाकूर यांनी एका कार्यक्रमादरम्यान केले होते.

गेल्या वेळेस यशोमती ठाकूर यांनी केलेल्या वक्तव्याची सारवा सारव करताना मी केवळ रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याची आठवण करू दिले असल्याचे सांगत विरोधकांवर पलटवार केला होता.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/