माथेरान – महाबळेश्वर पर्यटकांनी बहरला

कर्जतः पोलीसनामा ऑनलाईन – लॉकडाऊनमुळे गेली आठ महिने बंद असलेली पर्यटनस्थळे खुली (Tourist places open) करताच पर्यटकांनी आपल्या आवड्त्या माथेरान हिल स्टेशनवर मोठी गर्दी केली आहे. त्यातच पर्यटकांची आकर्षण असलेली मिनी ट्रेन सेवा सुरु केल्याने येथील पर्यटकांचा ओघ दिवसेंदिवस वाढतांना दिसत आहे. तसेच महाबळेश्वर, माथेरान, कार्ला आणि कोकणातील रिसॉर्ट देखील पर्यटकांनी भरू (Tourists began to fill up) लागले आहेत.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने मार्चपासून देशात लॉकडाऊन जाहीर केले होते. या दरम्यान केवळ जीवनावश्यक वस्तूची पुरवठा करणारी दुकाने सुरु होती. राज्यातील पर्यटन स्थळावर देखील पर्यटकांसाठी बंदी घातली होती. लॉकडाऊन काळात राज्याच्या सीमा केवळ अत्यावश्यक सेवेसाठी सुरु ठेवल्या होत्या. महाराष्ट्रात तर जिल्हाबंंदीच होती. त्यामुळे एप्रिल ते ऑगस्ट या काळात एका जिल्ह्यातून दुसर-या जिल्ह्यात किंवा एका राज्यातून दुस-या राज्यात जाण्यासाठी ई- पासची गरज होती.

आता राज्यातील जिल्हाबंदी उठवली आहे. त्यामुळे 1 सप्टेंबरपासून पर्यटन वाढीला लागले आहे. त्यामुळे थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वर, माथेरान, पाचगणी, कार्ला आदी परिसर पर्य़टकांनी बहरला आहे. कोरोनाचा नियमांचे दोन्ही स्थानिक प्रशासनाकडून काटेकोर पालन केले जात आहे. पर्यटन सुरु झाल्याने आर्थिक चणचण कमी झाली आहे.

तसेच रोजदारी व छोटे मोठे हातावरचे उद्योग सुरु झाल्याने स्थानिकांसह हॉटेल चालकांमध्ये उत्साह वातावरण दिसून येत होते. दरम्यान हॉटेल व्यावसायिकांनी आणि माथेरानमधील नागरिकांनी आपली काळजी घेऊन पर्यटकांना सेवा द्यावी, पर्यटकांनी देखील योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी पर्यटकांना केले आहे. माथेरान, महाबेळश्‍वर, कार्ला आणि कोकणातील रिसॉर्टवर पर्यटकांची मांदियाळी