‘कोरोना’वर वरदान ठरलेल्या इजेक्शनची चढया दरानं विक्री, मिरा रोडवरून दोघांना अटक

मीरा रोड : पोलीसनामा ऑनलाइन टीम –  राज्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण सापडण्याचा नव्या उच्चाकांची नोंद झाली. शुक्रवारी राज्यात तब्बल ७८६२ नवे रुग्ण आढळले आहेत. यामुळे राज्यातील कोरोना संसर्गित रुग्णांचा आकडा २,३८,४६१ वर पोहचला आहे. अशा परिस्थितीमध्ये काही जण टॉसिलिझिम ४०० एमजी या इंजेक्शनचा काळा बाजार करत असल्याचं समोर आलं आहे. असा काळा बाजार करणाऱ्यांवरती आता धडक कारवाई सुरु केली असून, या प्रकरणी मीरा रोड येथून दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, मीरा रोड येथे दोन व्यक्ती रेमडीसेव्हर आणि टॉसिलिझिम घेवून येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्याच पार्श्वभूमीवरती पोलीस आणि अन्न औषध प्रशासन विभागाने सापळा रचून दोन व्यक्तींना ताब्यात घेतले आणि त्यांची झाडाझडती केली असता त्यांच्याकडे Covifor, Remdesivir injection,100mg/20ml च्या ४ बॉटल आढळून आल्या. ज्याची किंमत २१ हजार ६०० रुपये नियमानुसार होती. तेच इंजेक्शन हे दोन व्यक्ती चढ्या दराने विना परवाना विकणार असल्याचं स्पष्ट झाले. ठाणे ग्रामीण पोलीस आणि अन्न औषध प्रशासनाने ही संयुक्त कारवाई केली आहे.

अशी करण्यात आली कारवाई

डॉ. बिनु वर्गीस यांना मीरा रोड येथील साईबाबा नगर येथे कोरोना संसर्ग इंजेक्शनचा काळाबाजर होत असल्याची माहिती मिळाली होती. नंतर पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक संजय कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून आरोपी सोनी दर्शी, रोड्रिक्स टोनीराळ यांना अटक करण्यात आली.

एकना मेडिकल दुकानातून शुक्रवारी ४ वाजेच्या सुमारास hetro company, Remdesivir injection, covifor असे एकूण ४ इंजेक्शन घेतले होते. एका इंजेक्शनची मूळ किंमत सुमारे ५४०० रुपये होती. मात्र, त्यांनी इंजेक्शनच्या ५४०० या किंमतीच्या तिप्पट म्हणजे २१००० रुपयांना विकणार होते. पण, पोलीस आणि डॉ. बिनु वर्गीस यांच्या सतर्कतेमुळे २ आरोपींना रंगेहात पडकले असून, यामध्ये एका नामंकित रुग्णालयाचा देखील समावेश आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like