अवैध वाळु वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टरने महिलेला चिरडले, संतप्त नागरीकांकडून जाळपोळ, रास्ता रोको

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – तापी नदीपात्रातून अवैध वाळू वाहतुक करणाऱ्या एका ट्रॅक्टरने महिलेला चिरडल्याची घटना शिरपूर तालुक्यातील जातोडे येथे सकाळी पाचच्या सुमारास घडली. त्यानंतर संसप्त गावकऱ्यांनी ट्रॅक्टर व दुचाकी पेटवून दिली. तसेच जिल्हाधिकारी आल्याशिवाय कोणताच निर्णय घेणार नसल्याचा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला आहे. कलाबाई सुदामसिंग राजपूत असे मृत महिलेच नाव आहे.

अवैध वाळू वाहतुकीचा प्रश्न
मोठ्या प्रमाणात चोरट्या मार्गाने अवैध वाळू वाहतुक केली जात आहे. मुळेच वाळु वाहतुक करुन नेताना अपघात होतात. यात नागरीकांचा बळी जात आहे. प्रशासनाचे या वाळु उपसा करण्याकडे दुर्लक्ष होते आहे.

कचरा टाकण्यासाठी गेल्यावर ट्रॅक्टरने चिरडले
शिरपूर तालुक्यातील जातोडे येथे संबंधित महिला पहाटे पाचच्या सुमारास कचरा टाकायला गेली होती. त्यावेळी अवैध वाळू वाहतुक करणार्‍या ट्रक्टरने चिरडले. त्यात महिलेचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर गावातील नागरिकांनी परिसरात गर्दी केली.

संतप्त गावकऱ्यांनी ट्रॅक्टर पेटवला
अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅकटर क्रमांक या वाहनाने महिलेला अत्यंत क्रूर चिरडल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला. जातोडा, बोरगाव येथील घटना गावातील नागरिकांना कळताच जमावाने घटनास्थळी गर्दी केली व रास्ता रोको केला. त्यानंतर संतप्त गावकऱ्यांनी वाळूमाफिया मोटार सायकल व इंडिका कारने गावात येऊन गावकऱ्यांना धमकावत होते. त्यावेळी एका वाळूमाफियाची दुचाकी गावकऱ्यांनी पकडून वाळूचे ट्रॅक्टर देखील जाळून टाकले आहे. दरम्यान कारने आलेले वाळू माफिया फरार झाले असून गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल
घटनेची माहिती पोलिसांना मिळताच प्रांत अधिकारी विक्रमसिंग बांदल, उपविभागिय पोलीस अधिकारी संदीप गावित, पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, मंडळ अधिकारी संजय जगताप यांनी घटनास्थळी भेट दिली. मयत महिलेच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या संशयिताविरोधात कठोर कारवाई करू असे आश्वासन दिले.

जिल्हाधिकारी घटनास्थळी दाखल झाल्याशिवाय निर्णय घेणार नाही
खुद्द जिल्हाधिकारी घटनास्थळी आल्याशिवाय कोणताच निर्णय होणार नाही असा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला. त्यानंतर घटनास्थळी पकडलेल्या चारपैकी एक ट्रॅक्टर व मोटारसायकल जमावाने पेटवून दिले. याप्रकरणी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

आरोग्यविषयक वृत्त

गर्भपाताची औषधे विकणाऱ्या ऑनलाईन पोर्टलविरोधात एफआरआय

बी. जे. महाविद्यालयात ‘पब्लिक हेल्थ अँड न्यूट्रिशन’ विशेष कोर्स

वजन कमी करण्याची ‘ही’ थेरपी करून पाहा