सोलापूर : धावत्या गॅस टँकरवर चढून भरकटलेलं वाहन केलं ‘कंट्रोल’

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – सोलापूर पुणे महामार्गावरील सावलळेश्वर टोलनाक्याजवळ गॅस टँकर वरील चालकाचे बेशुद्ध अवस्थेमुळे नियंत्रण सुटले होते. एवढ्यात महामार्ग पोलीस केंद्रातील पोलीस नाईक संजय चौगुले यांनी प्रसंगावधान राखून मोठ्या शिताफीने चालू गॅस टँकरवर चढुन दरवाजा उघडून ब्रेक मारुन टँकर थांबवला त्यामुळे पुढे होणारा अनर्थ टळला.

सविस्तर वृत्त असे कि सोलापूर पुणे महार्गावरील पाकणी येथील महामार्ग पोलीस मदत केंद्राजवळ पोलीस नाईक संजय चौगुले हे आपली ड्युटी बजावत होते. या दरम्यान पुण्याहून सोलापूरच्या दिशेने येणार ट्रक वेडावाकडा येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

त्यांनतर त्यांनी ट्रकला हात दाखवून थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा ट्रकचालक सीटवर बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसून आला. त्यानंतर पोलीस नाईक संजय चौगुले यांनी मोठ्या शिताफीने तो ट्रक थांबवून पुढे होणार अनर्थ टाळला. पोलीस नाईक संजय चौगुले यांच्या कार्याचे वरिष्ठानी कौतुक केले आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.