सातार्‍याकडून पुण्याकडे येणार्‍या वाहतुकीत बदल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शिपापूर टोलनाका हटाव कृती समितीच्या वतीने खेडशिवापूर येथील द्रुतगती महामार्ग क्र.4 वरील खेडशिवापूर टोलनाका बाहेर हटविण्यासाठी रविवारी आंदोलन (दि. 16 2020) करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने वाहतूकीत बदल करण्यात आला आहे. तत्पुर्वी आंदोलनाचे स्वरूप मोठे असून यात सर्व पक्ष सहभागी होणार असून, 8 ते 10 हजार नागरिक सहभागी होण्याची शक्यता आहे.

वाहतूक बदल सकाळी 6 ते रात्री 10 यावेळेसाठी असणार असून, परिस्थितीनुसार त्यात बदल केला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

सातारा बाजुकडून पुणे बाजूकडे येणारी सर्व वाहने कापुरहोळ चौक- सासबड ते पुणे बाजूने वळविण्यात येणार आहेत. तसेच, पुणे बाजुकडून सातारा बाजुकडे जाणारी सर्व वाहने पुणे शहर हद्दीतुन नबले ब्रिज- कात्रज चौक -खडीमशीन चौक ते सासवड कापुरहोळ अशी वळविण्यात येणार आहेत. तसेच सासवड तें कापुरव्होळ वाहतूक कोंडी निर्माणझाल्यास सासवड- जेजुरी- निरा- लोणंद मुर्गे सातार्‍याकडे वळविण्यात येणार आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like