पुणे पोलिसांचा ‘अजब’ कारभार, कार चालकावर केली ‘हेल्मेट’ सक्‍तीची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यामध्ये वाहतूक पोलिसांकडून हेल्मेट सक्तीची कारवाई करण्यात येत आहे. हेल्मेट न घालणाऱ्या चारचाकी चालकांनाही वाहतूक पोलीस सोडत नाही. असे म्हणण्याचे कारण म्हणजे यापूर्वी हेल्मेट न घातल्याने रिक्षा चालकावर पोलिसांनी दंड ठोठावला होता. आता चारचाकी वाहन चालकावर हेल्मेट न घातल्याबद्दल दंड ठोठावला आहे.
Car

नवनाथ हॉटेल चौकामध्ये वाहतूक पोलिसांनी कमलेश शुक्ला या वाहन चालकावर हेल्मेट न घातल्याबद्दल दंडात्मक कारवाई केली. मात्र, हा दंड चारचाकी चालवताना हेल्मेट न घातल्याबद्दल ठोठावण्यात आला आहे. दंडाच्या पावतीवर गाडीचा नंबर देण्यात आला आहे. मात्र, ही गाडी चारचाकी असून वाहतूक पोलिसांनी वाहन चालकाला 500 रुपयांचा दंड ठोठावला आहे.
Chalan

वाहन चालकाच्या मोबाईलवर पाठवण्यात आलेल्या चलनावर हेल्मेट न घातल्याप्रकरणी कारवाई करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. शिवाय त्यांच्या चारचाकी गाडीचा नंबरही त्यामध्ये लिहण्यात आला आहे. पोलिसांच्या या अजब कारवाईमुळे वाहन चालकांमध्ये नाराजी असून चारचाकी गाडी चालवताना ‘हेल्मेट’ आणि दुचाकी चालवताना ‘सीट बेल्ट’ वापरायचा का ? असा खोचक प्रश्न वाहन चालकांकडून पोलिसांना विचारला जात आहे.

Visit – policenama.com