विचित्र अपघात ! चालकाविना ट्रेलर आला ‘हायवेवर’, तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईमध्ये मेट्रोचे काम सुरु असून या कामादरम्यान एक भीषण अपघात झाला आहे. बोरिवली याठिकाणी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर हा अपघात झाला असून यामध्ये एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. चालक नसलेला एक ट्रेलर हायवेवरून आडवा गेला आणि त्याखाली एक दुचाकीस्वार चिरडला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात झाली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.

वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मेट्रोचे काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यातच या भीषण अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याने स्थानिकाकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, हा ट्रेलर विना चालक उभा होता. जो न बंद करता चालक बाहेर गेला. पण काही वेळाने ट्रेलर हायवेवर आला आणि त्यामध्ये तरुणाचा मृत्यू झाला.

रहदारीच्या ठिकाणी हा भीषण अपघात झाल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. दरम्यान, वाहतूक पोलिसांनी एका बाजून वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनांना रस्ता करून दिला. पोलिसांकडून मृत तरुणाची ओळख पटवण्यात येत असून नेमका अपघात कसा झाला याचा तपास पोलीस करत होते.

Visit : Policenama.com 

You might also like