ट्रेलर OUT : ‘बोल्डनेस’चा नवा शॉट घेऊन आलाय ‘Four More Shots Please’ चा दुसर सीजन ! (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन :लॉकडाऊनमध्य अ‍ॅमझॉन प्राईमनं आपल्या सब्सक्राईबर्ससाठी नवीन गिफ्ट दिलं आहे. प्राईमनं फेमस वेब सीरिज फोर मोर शॉट्स प्लीज च्या दुसऱ्यी सीजनचा ट्रेलर रिलीज केला आहे. या सीरिजच्या एपिसोडचा आनंद प्रेक्षकांना एप्रिलमध्ये घेता येणार आहे. या सीरिजच्या पहिल्या सीजनला खूप प्रतिसाद मिळाला होता. आता 4 मैत्रिणींची ही स्टोरी पुन्हा नव्या सीजनमधून वापसी करणार आहे. या सीरिजचे एपिसोड 17 एप्रिल 2020 पासून अ‍ॅमेझॉन प्राईमवर स्ट्रीम केले जाणार आहेत.

काय असेल स्टार कास्ट ?

सयानी गुप्ता, किर्ती कुल्हारी, बानी जे, मानवी गगरू, लिसा रे, प्रतिक बब्बर मिलिंद सोमन आणि इतर कलाकारांनी अभिनीत या शोची निर्मिती प्रितीश नंदी कम्यनिकेशन्स लिमिटेडनं केली आहे. या सीजनचं डायरेक्शन नुपुर अस्थाना हिनं केलं आहे. 2019 च्या सुरुवातीला अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रसारीत झालेल्या सीरिजमध्ये चार अनोख्या मुलींची ओळख करून देण्यात आली होती. या मुली स्वप्ननगरी मुंबईत दोस्ती, टकीला शॉट्स आणि जगण्यासोबतच प्रेम करत आपला आनंद शोधण्याचा प्रयत्न करतात.

शोच्या दुसऱ्या मजेदार आणि बोल्ड सीजनमध्ये इस्तांबुलच्या लुभाणाऱ्या शहरात सुंदर अशा मुलींचं रियुनियन दाखवलं जाणार आहे ज्या पुन्हा एकदा एकमेकांच्या लाईफमध्ये एन्ट्री करण्यासाठी तयार आहेत.

अनेक भाषेत उपलब्ध

दुसरा सीजन 200 देशात हिंदी, तेलगू, तमिळ सहित अनेक भारतीय भाषांमध्ये उपलब्ध केला जाणार आहे. अ‍ॅमेझॉन प्राईम इंडियाच्या युट्युब चॅनलरवरू शोचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like