जॅकलीन फर्नांडिसच्या ‘मिसेस सिरियल किलर’चा ट्रेलर रिलीज ! (व्हिडीओ)

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस जॅकलीन फर्नांडिस नेटफ्लिक्सवरील मिसेस सिरीयल किलर या आगामी सिनेमात दिसणार आहे. मिसेस सीरियल किलरचा ट्रेलरही रिलीज करण्यात आला आहे. .यामध्ये जॅकलीन फर्नांडिस, मनोज वाजपेयी, मोहित रैना, झेन मेरी खान हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.

सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर हा एक सायकॉलॉजिकल मर्डर मिस्ट्री ड्रामा आहे ज्यात जॅकी तिच्या नवऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असते. मनोज वाजपेयीनं तिच्या नवऱ्याची भूमिका साकराली आहे. ही प्रामुख्यानं एका डॉक्टरची कहाणी आहे ज्यात त्याला खुनांच्या मालिकेसाठी दोषी ठरवलं जातं. पत्नी आपल्या पतीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी सिरियल किलरप्रमाणेच गुन्हा करते.

जॅकलीननं अशा प्रकारे डार्क कॅरेक्टर साकारण्याची ही तशी पहिलीच वेळ आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. सिनेमाची पूर्ण स्टोरी नेमकी काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला सिनेमाच पहावा लागेल. परंतु ट्रेलर पाहिल्यानंतर तुम्हाला स्टोरीचा काही प्रमाणात अंदाज येतो. हा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर सोशलवर व्हायरल होत असून याची खूप चर्चा होताना दिसत आहे. जॅकलीन, मनोज वाजपेयी, सर्वांनीच आपापली भूमिका चांगल्या प्रकारे साकारली आहे.