फायद्याची गोष्ट ! रेल्वे तिकिट ‘बुक’ करताना ‘या’ पद्धतीनं पैसे वाचवा, ‘IRCTC’ न सांगितलं, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज ऑनलाइनचा जमाना असल्याने खरेदीवर कूपन, ऑफर, कॅशबॅक असे काही ऑफर मिळून ग्राहकांची सेविंग होते. रेल्वेच्या बुकिंगवर अशी कोणतीही ऑफर मिळत नाही. परंतू तिकिट बुकिंगवर आयआरसीटीसी (IRCTC) ने पैसे वाचवण्याची एक पद्धत सांगितली आहे.

अशी करता येईल बचत
IRCTC या खास उपायाचा फायदा तुम्ही देखील उचलू शकतात. आयआरसीटीसीने या संबंधित एक ट्विट केले आहे ज्यात त्यांनी सांगितले आहे की डेबिट कार्डच्या माध्यमातून प्रवासी पैसे कसे वाचवू शकतात. डेबिट कार्डच्या माध्यमातून रेल्वे बुकिंग केल्यास ग्राहकांना झिरो पेमेंट गेटवे चार्ज चा लाभ मिळतो. म्हणजेच ग्राहकांचे गेटवे वर जाणारे शुल्क वाचते. हे एक लाख रुपयांच्या व्यवहारावर लागू आहे.

IRCTC च्या वेबासाइटवरुन करु शकतात ऑनलाइन तिकिट
तुम्ही आयआरसीटीसीच्या आधिकृत वेबसाइटवरुन रेल्वे तिकिट बुक करु शकतात. यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाइल नंबर आणि ईमेलच्या माध्यमातून लॉगिन करु शकतात त्यानंतर तुम्हाला युजर आयडी, पासवर्ड, कॅच्पाच्या माध्यमातून लॉगिन करु शकतात, त्यानंतर तुमचे प्रोफाइल उघडेल, त्यानंतर जसे की तुम्ही तुमचे रेल्वे तिकिट बुक कराल तसे तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर, ईमेलवर ही माहिती येईल.

तुम्ही IRCTC च्या वेबासाइटवर तात्काळ तिकिट बुक करु शकतात. ही तिकिट 1 दिवसआधी बुक करावे लागेल. एसी क्लासची तिकिट बुकिंग सकाळी 10 ला सुरु होते तर नॉन एसी क्लासचे तिकिट बुकिंग सकाळी 11 वाजता सुरु होते. त्यासाठी तुम्हाला अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल.

Visit : Policenama.com