नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जाणारे प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांची नगापूर महानगरपालिकेच्या आयुक्त पदावरुन बदली करण्यात आली आहे. तुकाराम मुंडे यांची सदस्य सचिव महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मुंबई येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी राधाकृष्ण बी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांच्या बदलीचे आदेश आज (बुधवार) करण्यात आली आहे.

नागपूर महापालिकेती भाजपा नगराध्यक्षां विरोधातील वाद आयुक्त तुकाराम मुंढे यांना भोवला असल्याची चर्चा सध्या पालिका वर्तुळात आहे. मुंढे यांच्या जागी राधाकृष्ण बी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राधाकृष्णन यांना पदभार सोपवून तात्काळ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची जबाबदारी स्विकारावी असा आदेश काढण्यात आला आहे.