ट्रम्प यांनी केला 20 लाख ‘कोरोना’ वॅक्सीन बनवल्याचा दावा, म्हणाले – ‘लवकरच सुरू होईल वापर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एकीकडे अख्ख जग कोरोनासोबत लढा देत आहे. अशात आता अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे की, कोरोनावरील व्हॅक्सिन बनवण्याच्या दिशेनं मोठं यश मिळालं आहे. लवकरच याचा वापर करण्यासाठीही सुरुवात केली जाईल.

ट्रम्प यांनी अशी माहिती दिली की, व्हॅक्सिनवर कालच आमची बैठक झाली होती. आम्ही अतुलनीय काम करत होतो. आम्हाला खूप पॉझिटीव्ह सरप्राईज मिळाले आहेत. व्हॅक्सिन बनवण्याच्या दिशेनं मोठं यश मिळालं आहे. इतकंच नाही तर ट्रान्सपोर्टेशन आणि लॉजिस्टीकबद्दलही तयारी सुरू आहे.

अमेरिकेनं अद्याप 20 लाख व्हॅक्सिन तयार केल्या आहेत आणि हे सुरक्षित असल्याचं निश्चित झाल्यानंतर याचा वापर करण्यास सुरुवात केली जाईल.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like