गेल्या 70 वर्षात पाकिस्तानात हिंदूंच्या लोकसंख्येत ‘असा’ राहिला ‘उतार-चढाव’, जाणून घ्या

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दावा केला आहे की, पाकिस्तानातील हिंदूंची संख्या कमी झाली नाही तर वाढली आहे. गेल्या निवडणुकीत पाकिस्तान सरकारने देखील हेच सांगितले होते की देशात हिंदूंची संख्या कमी झाली नाही तर वाढली आहे. जाणून घेऊयात नेमकं यामध्ये किती तथ्य आहे.

फाळणी आधी पाकिस्तानमध्ये 24 % हिंदू राहत होते ज्यांची संख्या आता केवळ 1 % झाली आहे. एका वृत्तामध्ये याबाबतची माहिती समोर आली आहे.

फाळणी आदी कशी होती परिस्थिती
ज्यावेळी फाळणी झाली त्यावेळी पाकिस्तानात 15 % हिंदू लोकसंख्या होती. मात्र 1998 च्या जनगणनेनुसार ही संख्या 1.6 % असल्याचे स्पष्ट झाले. मात्र अजून पर्यंत हे समजले नाही की 15 % आकडा कोठे गेला.

फाळणी नंतर मोठ्या प्रमाणावर लोकांनी आपला ठिकाण बदलला आणि पाकिस्तानात तर प्रत्येक वर्षी हिंदू लोकसंख्या बदलत होती. ह्यूमन राइट सर्व रिपोर्ट नुसार पाकिस्तानात नेमकी कशी होती हिंदू लोकसंख्या याची आकडेवारी पुढील प्रमाणे

वर्ष – हिंदू लोकसंख्येची टक्केवारी
साल 1931 – 15 %
साल 1941 – 14 %
साल 1951 – 1.3 %
साल 1961 – 1.4 %
साल 1981 – 1.6 %
साल 1998 – 1.8 %

पाकिस्तानमधील आकडेवारी काय सांगते
फाळणी नंतर पाकिस्तानात जनगणना करण्यात आली यावेळी नेमकी कशी होती हिंदूंच्या संख्येची आकडेवारी जाणून घेऊयात साल 1951 ला पाकिस्तानमध्ये हिंदूंची संख्या 3.1 % होती. तर 1998 मध्ये ही संख्या 3.71 % झाली होती. वेगवेगळ्या अनेक अहवालात देखील हिंदूंची संख्या वाढल्याचे आढळून आले होते.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने हे देखील सांगितले की, 1998 च्या आकडेवारीनुसार हे देखील समजते की, पाकिस्तान हिंदूंची लोकसंख्या 1951 ते 1998 दरम्यान 2 % नी वाढली.

2018 मध्ये निवडणुकीआधी हिंदूंची आकडेवारी
पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने 2018 मध्ये मतदारांची यादी जाहीर केली होती. यावेळी गेल्या पाच वर्षांमध्ये पाकिस्तानात मुसलमानांव्यतिरिक्त 30 % मतदारांची वाढ झाली आहे. यामध्ये हिंदूंची संख्या सर्वात जास्त आहे.

किती वाढली हिंदूंची संख्या
पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार 2013 च्या निवडणुकीत हिंदू मतदारांची संख्या 14 लाख होती आणि हीच संख्या 2018 च्या निवडणुकीत 17.7 लाख इतकी झाली. म्हणजेच मतदारांच्या संख्येत तीन लाख 70 हजरानी वाढ झाली.

काय सांगतो रिसर्च
पाकिस्तानमधील हिंदू सर्वात मोठे अल्पसंख्याक आहेत. जर आपण लोकसंख्येबद्दल चर्चा केली तर 2017 मध्ये त्यांची लोकसंख्या 38.8 लाख होती. पाकिस्तानमध्ये सध्या पाचव्या क्रमांकाची हिंदू लोकसंख्या आहे. पीईडब्ल्यू संस्थेच्या संशोधनात म्हटले आहे की 2050 पर्यंत 52 लाखाहून अधिक हिंदू असतील. तर हिंदू लोकसंख्येच्या बाबतीत पाकिस्तान चौथ्या क्रमांकाचा देश असेल.

पाकिस्तानात अवघड होते हिंदू म्हणून जगणे
विश्लेषकांच्या मते 1947 मध्ये हिंदूंची संख्या 16 % पर्यंत गेली होती. परंतु फाळणीनंतर ही संख्या 1.3 % झाली. फाळणीनंतर पाकिस्तानात हिंदूंचे जीवन फार कठीण होते. तेथे राहणार्यावर धर्म परिवर्तन करण्याचा वारंवार दबाव होता. त्यामुळे 1960 पर्यंत तेथून हिंदू भारतात येत होते. आजही अनेक हिंदू शरणार्थी भारतात येतात. भारताकडून पाच ते 10 हजार हिंदू शीख शरणार्थीना नागरिकांत प्रदान करत आहे.

काय झाले होते फाळणी वेळी
आकडेवारीत असेही म्हटले आहे की केवळ 14 ऑगस्ट 1947 रोजी, पश्चिम पंजाबमधील 20 लाख हिंदू आणि शीख हे पूर्व पाकिस्तानात गेले, जे भारतात येत होते. 18 सप्टेंबर ते 29 ऑक्टोबरच्या दरम्यान 8.49 लाख हिंदू आणि शिख यांनी सीमा ओलांडून भारतात प्रवेश केला. एवढ्याच प्रमाणात मुसलमान देखील पाकिस्तानात पोहचले होते.

1941 च्या जनगणनेनुसार 1941 मध्ये पूर्व पंजाबमध्ये 50 लाख मुस्लिम राहत होते.1950 पर्यंत जवळपास 47 लाख हिंदू आणि शीख व 65 लाख मुस्लिम येथून तिकडे आणि तिकडून इकडे झाले आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/