बलात्काराच्या गुन्ह्यात ‘या’ अभिनेत्याला अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बलात्काराच्या प्रकरणात सिंगर करण ओबेरॉयला मुंबईत अटक करण्यात आली. पीडितेचा बलात्काराचा व्हिडोओ तयार करून तो व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. करणला आज दुपारी ओशिवारा पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला ९ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

करण हा ‘जस्सी जैसी कोई नही’ या टीव्ही शोमुळे घराघरात पोहचला होता. तसेच प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री मोना सिंह हिचा तो एक्स बॉयफ्रेंड आहे. त्याच्या विरोधात मुंबईतील ओशिवारा पोलीस ठाण्यात बलात्कार आणि ब्लॅकमेलचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता करणने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. तसेच आरोपीने बलात्काराचा व्हिडीओ तयार करून पीडितेला ब्लॅकमेल करू तिच्याकडे पैशांची मागणी केली. पैसे दिले नाही तर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. पीडितेने ओशिवरा पोलीस ठाण्यात करणवर गुन्हा दाखल केला.