गायिका नेहा कक्कर ‘या’ प्रसिध्द गायकाच्या मुलाशी लग्न करणार ? संपूर्ण कुटूंबाशी घेतली भेट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडची सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्कर सध्या प्रसिद्ध सिंगिंग रिअ‍ॅलिटी शो म्हणजेच ‘इंडियन आयडल 11’ ला जज करत आहे. या शोमध्ये आल्यापासून नेहा चर्चेमध्ये आली आहे. नेहा कधी स्पर्धकाची कथा ऐकल्यानंतर रडते, तर कधी ती त्यांच्या टॅलेंटवर खूश होऊन स्वतः बक्षीस देते. नेहाची एक गोष्ट चाहत्यांच्या समोर आली आहे. हे एकून चाहत्यांना नक्कीच धक्का बसेल यात शंका नाही.

https://www.instagram.com/p/B7AK5QEH4Hd/

नेहा कक्करच्या लग्नाची तयारी ‘इंडियन आयडल 11’ च्या सेटवर सुरु झाली आहे. इतकेच नाही तर शोच्या सेटवर नेहाच्या सासरचे संपूर्ण कुटुंब तिला भेटायला आले आहे आणि त्यांना उघडपणे नेहा ‘सून’ म्हणून स्विकार केला आहे. नेहा नेहा कक्करच्या लग्नाची चर्चा तेव्हा सुरु झाली जेव्हा इंडियन आयडॉलच्या सेटवर आदित्य नारायणचे वडील उदित नारायण आपल्या पत्नीसोबत पोहचले.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार उदित नारायण आणि अलका याज्ञिक इंडियन आयडल 11 च्या पुढच्या एपिसोडमध्ये येणार आहेत. या शोमध्ये उदित नारायण आपल्या मुलाच्या नावाने नेहा कक्कर यांना टीज करताना दिसणार आहेत. त्याचबरोबर उदित नारायण हेसुद्धा पहिल्या एपिसोडपासून हा शो फॉलो करत असल्याचे सांगताना दिसणार आहे, यासाठी दोन कारणे आहेत. एक, या शोचे स्पर्धक खूप हुशार आहेत आणि दुसरे म्हणजे नेहा कक्कड़ हिला त्यांची सून बनवायची आहे.

या रिपोर्टमध्ये पुढे असेही सांगितले गेले आहे की, केवळ उदितच नव्हे तर त्यांची पत्नी दीपा नारायण यांनी नेहालाही या शोमध्ये नारायण कुटूंबाची सून बनवण्याविषयी बोलले आहे. इतकेच नाही तर नेहाचे आई-वडीलही या शोमध्ये आले होते आणि त्यांनीही या लग्नाला होकार दिला आहे. यादरम्यान आदित्य खूपच खूश दिसला, पण नेहा असे म्हणताना दिसली की, जर तिने लवकरच लग्नाची तयारी दर्शविली तर काही मजा राहणार नाही. ह्या भागाचे शूटिंग पुर्ण झाले आहे आणि हा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे.

हा सगळा शोचा एक भाग देखील असू शकतो, कारण या कार्यक्रमाच्या होस्टच्या भूमिकेत दिसणारा आदित्य बर्‍याचदा शोची जज नेहा कक्कर हिच्याशी फ्लर्ट करताना दिसतो. आता हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे की, नेहा याविषयी काय बोलते. कारण काही महिन्यांपूर्वी अभिनेता हिमांश कोहलीचा आणि तिचा ब्रेकअप झाला होता. या ब्रेकअपनंतर ती खूपच दुःखी झाली होती.

https://www.instagram.com/p/BudbZN-nQz3/

 

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/