‘शिल्पा अन् रश्मी’सह ‘या’ 8 अभिनेत्री सिद्धार्थ शुक्लाच्या ‘गर्लफ्रेंड’, ‘ऑनस्क्रीन’ सासूसोबतही ‘रोमँस’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बिग बॉस 13 चा विनर झाल्यानंतर सिद्धार्थ शुक्लाच्या फॅन फॉलोविंगला चार चांद लागल्याचं दिसत आहे. सिद्धार्थनं आजपर्यंत आपल्या टीव्ही मधील अभिनयानं सर्वांचं मन जिंकलं आहे. आता बिग बॉसनंतर मात्र त्याची फॅन फॉलोविंग वाढल्याचं दिसत आहे. बिग बॉसचा विनर झाल्यानंतर सिद्धार्थची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. त्याच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक गोष्टी समोर येताना दिसत आहे. सध्या त्याच्या लव लाईफची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

एका मीडिया रिपोर्टनुसार सिद्धार्थ आता पर्यंत एक नाही तर दोन नाही तर तब्बल 8 अभिनेत्रींना डेट केलं आहे. बिग बॉसदरम्यानही त्याच्या काही रिलेशनशिप्सबद्दल अनेक बातम्या समोर येताना दिसल्या. एका इंग्रजी वृत्तात म्हटलं आहे की, सिद्धार्थनं आतापर्यंत शिल्पा शिंदे, रश्मी देसाई, शेफाली जरीवाला, आरती सिंह, दृष्टी धामी, पवित्रा पुनिया आणि ऑन स्क्रीन सासू स्मिता बंसल यांना डेट केलं आहे.

सिद्धार्थनं केलं या अभिनेत्रींना डेट

शिल्पा शिंदेनं अलीकडेच खुलासा केला होता की, ती सिद्धार्थ शुक्लासोबत रिलेशनशिपमध्ये होती. दिल से दिल तक या मालिकेदरम्यान रश्मी देसाई आणि सिद्धार्थमध्ये जवळीकता वाढताना दिसली. रश्मीनंही कबूल केलं होतं की, ब्रेकअपनंतर सिद्धार्थनं तिला मालिकेतून काढण्याचा प्रयत्न केला होता. बालिका वधू या मालिकेदरम्यान ऑनस्क्रीन सासू स्मिता बंसलसोबत त्याच्या जवळकीतेच्या चर्चाही सुरू होत्या. बिग बॉस 13 मध्ये स्पर्धक शेफाली बग्गानं खुलासा केला होता की, आरती आणि सिद्धार्थनं एकमेकांना डेट केलं आहे. परंतु पुढे काही झालं नाही. पारस छाबडाची गर्लफ्रेंड आकांक्षा पुरीलाही त्यानं खूप आधी डेट केलं आहे.

सिद्धार्थनं रिलेशनशिपवर कधीच खुलून भाष्य केलं नाही हेही तितकंच खरं आहे. परंतु अनेक रिपोर्टमध्ये त्याच्या रिलेशनशिपबद्दल वेळोवेळी सांगण्यात आलं आहे. अनेकदा अनेक चर्चा समोर येताना दिसल्या आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like