Bigg Boss 14 : एजाज खानसाठी वाढत चाललेय पवित्रा पुनियाचे प्रेम, जान कुमार समोर पुन्हा केले व्यक्त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –    बिग बॉस 14 मध्ये एक नवीन प्रेमकथा सुरू होताना दिसत आहे. घराची मजबूत स्पर्धक समजल्या जाणाऱ्या पवित्र पुनियाच्या हृदयात एजाज़ खानविषयीचे प्रेम वाढत आहे. काही दिवसांपूर्वीच पवित्राने व्यक्त केले होते की, तिला एजाज आवडू लागला आहे आणि त्याच्याशी ती भावनिकदृष्ट्या जोडली गेली आहे. मात्र, त्यानंतर या दोघांमध्ये काही अंतर आले होते आणि जोरदार भांडणही झाले होते. पण आता हळू हळू दोघे पुन्हा जवळ येत आहेत. दरम्यान ही जवळीक पावित्राच्या बाजूने जास्त दिसून येत आहे. परंतु एजाजने प्रत्येक वेळी हे नाकारले आहे की, पवित्रबद्दल त्याच्या मनात अशी काही भावना आहे.

आजच्या भागात, पवित्रा पुन्हा एजाजबद्दल आपल्या भावना व्यक्त करेल. ती जॉन कुमारला सांगेल की, तिला समजलेच नाही कि, कधी तिला एजाजशी इतक अटॅचमेंट झाली. कलर्सच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे कि, एजाज निक्कीला आपली दाढी डाय करण्याविषयी विचारतो. यानंतर निक्की म्हणते, पवित्राला विचारा ती जशी म्हणते तसेच करा कारण तिला तुम्ही आवडता, ती दिवसरात्र तुमच्याबद्दल बोलत राहते ‘.

यानंतर पवित्रा जान असे म्हणताना दिसत आहे की, ‘तो येथे आला आणि सर्व काही बदलले आहे आणि मला कळाले देखील नाही’. जान तिला सांगताना दिसत आहे की, ‘तुम्हा दोघांमध्ये जो राग होता, भडास होती, ते सगळं गेल आहे. त्यामुळे तुम्ही दोघांनी तुम्ही जसे आहेत तसे स्वीकारले आहे.’ यानंतर व्हिडिओमध्ये एजाज पवित्राला किस करताना दिसत आहे.

You might also like