टाईप न करता कराता येऊ शकते ट्विट, आले नवीन फिचर

बँकॉक : वृत्तसंस्था – सोशल मीडियावरील एक महत्त्वाचा प्लॅटफॉर्म असलेल्या ट्विटरवर आता आपल्या आवाजातील ट्विट करणे शक्य होणार आहे. ट्विटरने त्यासाठी ‘व्हॉइस ट्विट’ची खास सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे मजकूर टाईप करण्यापासून युजर्सची सुटका होणार आहे. पहिल्या टप्प्यात काही ठराविक युजरना याचा लाभ घेता येणार आहे. यानंतर हळूहळू सर्वांसाठी हे फिचर वापरता येणार असल्याची माहिती ट्विटरने दिली आहे.

ट्विटरने म्हटले आहे की, यापूर्वी ट्विटरवर अशा प्रकारे सुविधा नव्हती. युजरला आपले ट्विट टाईप करावे लागत होते. त्यासाठी त्यांना 280 अक्षरांची मर्यादा होती. त्यामुळे अनेकांना आपल्या भावना ट्विट करताना अडणी येत होत्या. त्याचा फटका ट्विटरला बसला आहे. त्यामुळे युजरच्या मानवी भावना जपण्यासाठी हे नवीन फिचर लाँच करण्यात आले आहे. व्हॉइस ट्विट करण्याची पद्धत जुन्या ट्विट टाइप करायचो त्याचप्रमाणे ठेवण्यात आली आहे.

कसे करायचे व्हॉइस ट्विट
– सुरुवातीला ट्विट कंपोझर ओपन करावे.
– तेथील वेवलेंथ आयकॉन टॅप करावा
– टॅप केल्यानंतर रेकॉर्डिंग सुरु होईल
– रेकॉर्डिंग सुरु झाल्यानंतर त्यामध्ये आपला प्रोफाइल फोटो दिसेल
– त्याला टॅप केल्यानंतर तुमचे व्हॉइस ट्विट पूर्ण होईल. ते तुम्ही पाठवू शकता.

व्हॉइस ट्विटची वैशिष्ट्ये
– 140 सेकंदामध्ये व्हॉइस ट्विट करता येईल
– त्यापेक्षा अधिकही वेळ तुम्हाला ट्विट करता येईल. मात्र लगेच दुसरे ट्विट सुरु होईल.
– पहिल्या प्रमाणेच आपले हे व्हॉइस ट्विट आपल्या प्रोफाइलवर दिसेल
– दुसऱ्या ट्विटसाठी स्क्रोल केल्यानंतरही पहिले ट्विट ऐकता येईल
– दुसरे कोणतेही काम करत असताना अशी ट्विट तुम्ही ऐकू शकता.