2 तोंडी साप पाहून लोक घाबरले, ‘चत्मकार’ म्हणून पाजवू लागले दूध

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुम्ही तुमच्या आसपास अनेक साप पाहिले असतील. परंतू दूतोंडी साप तुम्ही पाहिला आहे का? तुम्ही विचार करत असाल की दोन तोंडी साप असतात? याचे उत्तर आहे हो. पश्चिम बंगालच्या मिदनापूरमध्ये एका गावात दुर्लभ प्रजातीचा दोन तोंडी साप आढळला आहे. गावात हा साप आता कौतुकाचा विषय बनला आहे.

हा दोन तोंडी दुर्लभ साप बेल्दा फॉरेस्टच्या जवळ आढळला आहे आणि हा नाजा कौठिया प्रजातीचा असल्याचे सांगितले जात आहे. दोन तोंड असलेला साप पाहण्यासाठी लोक दूर दूरच्या गावातून येथे येत आहेत, श्रद्धा म्हणून सोबत सापाला पाजण्यासाठी दूध देखील आणत आहे.

नाजा कौठिया प्रजातीचा साप अत्यंत धोकादायक आणि विषारी समजला जातो. लोकांना या सापापासून दूर राहण्यास सांगण्यात आले आहे. सध्या दोन तोंडी या सापाला वन विभागने आपल्या सुरक्षेत ठेवले आहे.

असाच दोन तोंडी साप याच वर्षी सप्टेंबर महिन्यात अमेरिकेच्या न्यू जर्सीमध्ये आढळला होता. ज्याला रॅटल स्नेक सांगण्यात आले होते. सापाचे पहिले नाव आणि दोन तोंड यामुळे पशुचिकित्सकांनी त्याला डबल डेव नाव दिले आहे.

या दोन तोंडी सापाला दोन डोकी आहेत, चार डोळे आहेत, दोन जीभ आहेत, त्याचे एक शरीर त्याला दुसऱ्या सापांच्या तुलनेत वेगळे ठरवते. विशेषज्ञांच्या नुसार दोन तोंडी साप कदाचितच जंगलात जिवंत राहतात कारण त्याची सरपटण्याची गती कमी असल्याने त्यांना दुसरे जीव लक्ष करतात.

Visit : policenama.com