पुणे : ट्रक-दुचाकीचा भीषण अपघात ; २ जण ठार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – भरधाव वेगातील ट्रकच्या धडकेत २ दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना कोंढवा सासवड बायपासवर पिसोळी येथे घडली. यातील एकजण जागीच ठार झाला. तर दुसऱ्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

राम अगधं माने (वय २६), बबन महादेव इंगळे ( वय २६, रा. वाघजई नगर, कात्रज) अशी ठार झालेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिसांनी राजेश पासवान (वय ३७, रा. समृद्धी नगर बिहार) याला अटक केली आहे.

राम माने आणि बबन इंगळे हे दोघे वायरमनचे काम करतात. दरम्यान, ते दोघे कात्रज येथून हांडेवाडी चौकात जात होते. त्यावेळी पिसोळी येथे पासवान याचा ट्रक येत होता. तेथे आल्यावर ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार ध़डक दिली. यात राम माने जागीच ठार झाला. तर बबनला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्याचा उपचारादरम्यन मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाडकर करत आहेत.

Loading...
You might also like