जम्मू-काश्मीरमध्ये मशिदीत लपून बसलेल्या 2 दहशतवाद्यांचा खात्मा

ADV

पोलिसनामा ऑनलाईन – जम्मू-काश्मीरमधील अवंतीपोरा आणि शोपियामध्ये पुन्हा एकदा चकमक सुरू झाली. अवंतीपोरा येथे गुरुवारी एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला होता. तर अन्य दोन दहशतवादी पंपोर भागातील मीज गाव येथील मशिदीत लपून बसले होते. आज पहाटे झालेल्या चकमकीत दोन्ही दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आले आहे.

ADV

अवंतीपोरा भागात दहशतवादी दडून बसल्याची माहिती काल मिळाली होती. त्यानुसार लष्कराच्या 50 आरआर, एसओजी आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने शोध मोहीम सुरू केली. दहशतवाद्यांचा याची जाणीव होताच त्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. सुरूवातीस जवानांकडून दहशतवाद्यांना शरण येण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र तरी देखील दहशतवद्यांकडून गोळीबार सुरू राहिल्याने, जवानांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. ज्यामध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा झाला होता. तर अन्य दोघेजण मशिदीत घुसले होते. आज सकाळी देखील जवानांकडून दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र दहशतवादी ऐकत नसल्याचे दिसताच, स्पेशल ऑपरेशन ग्रुप (एसओजी) कमांडो मशिदत घुसले व दोन्ही दशतवद्यांचा खात्मा केला. दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. दुसरीकडे शोपियामधील मुनांद येथे देखील शोधमोहीम सुरू आहे. या ठिकाणी काल झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला होता. जवानांच्या माहितीनुसार या ठिकाणी आणखी दहशतवादी दडून बसले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात जवानांनी वेढा दिलेला आहे.