लोणीकंद पोलिसांकडून दुचाकी चोरांना अटक

वाघोली : पोलीसनामा ऑनलाइन – लोणीकंद पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान पाठलाग करून दुचाकी चोरणाऱ्यास पकडून त्याच्याकडून चोरीची दुचाकी जप्त केली. सुमन शंभु चक्रवर्ती (वय २१, सध्या रा. केसनंद रोड झोपडपट्टी, वाघोली, मूळ गाव कोलकत्ता) असे दुचाकी चोरून नेणाऱ्याचे नाव आहे.

लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाईफ रोड येथून रविवारी (१०) मध्यरात्री पल्सर दुचाकी चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार गाडीचे मालक अभिनंदन वानखेडे यांनी लोणीकंद पोलीसांत दिली होती. लोणीकंद पोलीस वाघोलीत पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदाराद्वारे सुमन चक्रवर्ती या चोरट्याची माहिती मिळाली. त्यास पोलिस दिसताच त्याने दुचाकी सोडून वाघेश्वर पॅलेसच्या मागील बाजूस असणाऱ्या उसाच्या शेतात पळ काढला. तीन किमी पाठलाग करून शेतात लपलेल्या चक्रवर्तीला ताब्यात घेतले.

ही कारवाई पोलीस निरीक्षक डी. एस. हाके, उपनिरीक्षक हनुमंत पडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमंत होनमाने, समीर पिलाणे, सुरज वळेकर, संतोष मारकड, काळे, बाळासाहेब तनपुरे यांनी केली.

Visit : Policenama.com 

 

Loading...
You might also like